Friday, April 19, 2024

Latest Posts

कर्नाटकात काँग्रेसने आतापर्यंत मारली बाजी, आमदारांसाठी निकालापूर्वीच रिसाॅर्ट केलंय बुक

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी १३ मे रोजी होणार आहे. मतदानानंतर चाचण्यांचे निष्कर्ष हे काँग्रेसच्या बाजूनेच लागणार आहे हे निश्चितच होते. कारण काँग्रेसने घेतलेल्या भारत जोडो यात्रेचा परिणाम हा या निवडणुकीवर होणार होता हे तर तेव्हाच स्पष्ट झाले होते.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी १३ मे रोजी होणार आहे. मतदानानंतर चाचण्यांचे निष्कर्ष हे काँग्रेसच्या बाजूनेच लागणार आहे हे निश्चितच होते. कारण काँग्रेसने घेतलेल्या भारत जोडो यात्रेचा परिणाम हा या निवडणुकीवर होणार होता हे तर तेव्हाच स्पष्ट झाले होते. कारण राहुल गांधी यांनी या निवडणुकीसाठीच भारत जोडो यात्रेचा प्लॅन आखला असावा असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे १० मे ला झालेल्या निवडणुकीचा निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागणार असल्याचे दिसून येत आहे. आणि त्यामुळे मोदी सरकार म्हणजेच भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. कर्नाटक हे एकमेव राज्य आहे ज्यात त्यांनी तब्बल ३८ वर्षे त्यांनी त्यांची जुनी परंपरा कायम राखली आहे. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे.

थंडीच्या मौसमातही त्या परिस्थितीत भारत जोडो यात्रे दरम्यान कर्नाटकातील कानाकोपरा पिंजून काढलेल्या काँग्रेसला तेथील मतदारांनी साथ देऊन अभूतपूर्व कौल दिला आहे. काँग्रेसने कर्नाटकात जोरदार मुसंडी मारली असून काँग्रेसने एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. हाती आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर काँग्रेसने आत्तापर्यंत १३० जागांवर आघाडी मिळवली आहे. सध्या महाराष्ट्रात भाजपकडून आमदार फोडाफोडीचा आजवरचा देशातील इतिहास बघता काँग्रेसकडून या निवडणुकीतून ठोस पाऊले उचलण्यात आली होती. आणि त्यामुळेच आमदारांना बंगळूरमध्ये एकत्र करण्याचा निर्णय घेत काँग्रेसने हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केले आहे. अशी माहिती हरिप्रसाद यांनी दिली आहे.

काँग्रेसच्या बीके हरिप्रसाद याना काँग्रेसचं विजयाचे कारण विचारले असता ते म्हणाले की, राहुल गांधींचे सदस्यत्व जपून राहणे हा निवडणुकीतील निर्णायक मुद्दा होता. तसेच बजरंग बली आणि बजरंग दलाच्या मुद्द्यावर बीके हरिप्रसाद म्हणाले की, कर्नाटकच्या जनतेला मूर्ख बनवता येणार नाही. कर्नाटकातील जनतेला बजरंगबली आणि बजरंग दलातील फरक माहित आहे. बजरंगबली आमचा देव आहे. लोक बजरंग दलाकडे राजकीय संघटना म्हणून पाहतात. त्यामुळेच मोठा फरक पडला नाही. कर्नाटकातील काँग्रेसला एकही संधी हातातून निसटू द्यायची नाही यासाठी काँग्रेस पक्षाने पूणर खबरदारी घेऊन त्या दृष्टीने कंबर कसली आहे. तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः तेथे उपस्थित असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, काँग्रेसने चांगली कामगिरी केली असून कर्नाटकात काँग्रेसचे सरकार नक्कीच स्थापन होईल.

हे ही वाचा:

Karnataka मध्ये Congress बहुमताच्या उंबरठ्यावर, राहुल गांधींचे सूचक ट्विट होतंय व्हायरल

Karnataka Assembly election 2023 Result, पहिल्या अर्ध्या तासातच कर्नाटकातील चित्र स्पष्ट, काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर

Karnataka Assembly election 2023 Result, कर्नाटकात कुणाचा गुलाल उधळणार?, निकालाचं काऊंटडाऊन सुरू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss