महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ५ दिवस उलटूनही मुख्यमंत्रीपदाबाबतचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मात्र, मुख्यमंत्रीपदाबाबतचा तिढा आज २८ नोव्हेंबरला सुटण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज अमित शाह यांची भेट घेणार आहेत. दिल्लीत मुख्यमंत्रीपदाबाबत निश्चिती झाल्यानंतर काही मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे आज सकाळपासूनच सागर बंगल्यावर आमदारांची गर्दी पाहायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सकाळपासून नवनीत राणा, राणी राणा, धनंजय मुंडे, भारत गोगावले, जयकुमार रावल, सुधीर मुनगंटीवार, आशिष देशमुख हे आमदार दाखल झाले आहेत. कालच्या दिवसभरात देखील महायुतीमधील अनेक आमदार सागर बंगल्यावर दाखल झाले होते. अनेक आमदारांमध्ये मंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु आहे.
तसेच महाराष्ट्रातील नवीन सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होणारे असून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानांतर इतर मंत्र्यांचीही नवे निश्चित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
Eknath Shinde यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री ?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.