PM Narendra Modi MP Visit : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यासह देशभरातील सर्व नागरिकांना विधानसभा निवडणुका कधी होणार असे प्रश्न पडले होते. काही राज्यच्या विधसनसभा निवडणुका या जाहीर झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (MP Assembly Elections 2023) पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील कंबर कसली आहे. नरेंद्र मोदी हे स्वतः मैदानात उतरून धुवादार बॅटिंग करणार आहेत.
बाबा महाकालचे शहर उज्जैन (Ujjain) येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मध्य प्रदेश दौऱ्यावर असतील. दिनांक ३० ऑक्टोबरला उज्जैनमध्ये भाजपची मोठी सभा होणार आहे. निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधानांची ही पहिलीच सभा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोक यात सहभागी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी पार पडलं. या कार्यक्रमासाठी उपस्थिती प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा यांनी भाजप नेत्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींच्या सभेची माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीचे काउंटडाऊन आता सुरू झाले आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून आपापल्या स्टार प्रचारकांसह सभा घेण्याची तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्ष मध्य प्रदेशातील माळवा भागातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहे. यासाठी धार्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उज्जैनची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी माळवा भागातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या संमेलनाला संबोधित करणार आहेत. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. या परिस्थितीत भाजप आपल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात उज्जैनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य सभेने करणार आहे. ३० ऑक्टोबरला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये पंतप्रधान मोदी मोठ्या सभेने निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. भाजपच्या अगदी छोट्या कार्यकर्त्यांपासून ते बड्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी या भव्य सभेची तयारी सुरू केली आहे. या सभेसाठी नानाखेडा स्टेडियम किंवा कार्तिक फेअरच्या आवारातही सभा आयोजित करण्याचं नियोजन सुरु आहे. पंतप्रधान मोदी महाकाल मंदिराला भेट देणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
हे ही वाचा :
पुण्यातील कोयता गॅंगने हॉटेल चालकावर केला हल्ला
बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेंची धाकधूक वाढली