Sharad Pawar: शरद पवार यांचा गड भाजपच्या माऱ्यापुढे अखेर ढासळला, महायुतीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये ५८ पैकी ४६ जागा विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे ही कमालीची बदलली आहेत. आतापर्यंत कितीही चढउतार आले असले तरी पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता. भाजपने काही मध्यंतरीच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारली असली तर या भागातील शरद पवार यांच्या वर्चस्वाचा पगडा कमी झाला नव्हता, मात्र, यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी जा समाज पार धुळीला मिळवल्याचे चित्र आहे. महायुतीला पश्चिम महाराष्ट्रतील एकूण ५८ विधानसभा मतदारसंघापैकी ४६ जागांवर महायुतीला विजय मिळवला आहे. यामध्ये अजित पवार गटाला ११, भाजपचे २४ आणि काँग्रेसला मिळालेल्या एका जागेचा समावेश आहे. साखर पट्ट्यात महायुती आणि भाजपला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे शरद पवारांचा सर्वात भक्कम बालेकिल्ले ढासळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
आतापर्यंत शरद पवार यांनी सहकारी संस्था, साखर कारखाने आणि सहकार चळवळीची सांगड घालून पश्चिम महाराष्ट्रत स्वतःच्या पक्षाची मोठी ताकद उभी केली होती. भाजपने देशात २०१४ नंतर राज्यात सत्ता काबीज केली असली तरी शरद पवारांच्या पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला मोठा धक्का बसला नव्हता. राज्यामध्ये कितीही नुकसान झाले तरीही जोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांची ताकद कायम आहे. तोपर्यंत पवार ब्रँडला धक्का लागणार नाही, असे एक गृहितीक होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने हे गृहितीक पूर्णपणे मोडूनतोडून टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व होते. गेल्या विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील २१ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. तर ऐकून २७ जागा पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना पश्चिम महाराष्ट्रात अवघ्या ७ जागा मिळाल्या आहेत. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सातारा आणि कोल्हापूर या बालेकिकिल्ला समजला जाणाऱ्या भांगामध्ये शरद पवार गटाला एकही जागा न मिळण्याची नामुष्की ओढवली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात महाविकासआघाडी फेल का झाली?
महाविकासआघाडी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापासून कुरबुरीत सुरु असल्याचे चित्र दिसत होते. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? या गोष्टीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद रंगला होता. त्यामुळे ग्राऊंड लेव्हलला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये फारसा समन्वय नव्हता. याचा फटका शरद पवार गटाला आणि पर्यायाने मविआला बसला. याशिवाय, या भागात पूर्वी भाजपने काँग्रेसमध्ये असलेल्या अनेक नेत्यांना रिंगणात उतरवले होते. . तसेच लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीच्या बाजूने निर्माण झालेले वातावरण मविआला आपल्या बाजूने वळवणे शक्य झाले नाही. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी आपल्या सभांमध्ये कापूस आणि सोयाबीनसह शेतमालाच्या दराचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केले होता. मात्र हा मुद्दा स्थानिक मतदारांना आणि शेतकरी वर्गला मतदारांना तितकासा भावला नाही.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”