अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्या मागील वादांचे शुक्लकाष्ट संपता संपत नाहीय. कधी अदानींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत येत आहेत तर कधी शरद पवारांना अदानींशी संबंधित बोचरे प्रश्न त्रास देत आहेत. आता तर पंतप्रधान मोदींविरोधात देशातील दिग्गज राजकारणी एकत्र येत असतानाच विरोधकांची ‘इंडिया’ अडचणीत येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांनी एकत्र येत २८ पक्षांची ‘इंडिया’ ही आघाडी बनवलीय. त्याची तिसरी बैठक मुंबईत ३१ ॲागस्ट आणि १ सप्टेंबरला होणार आहे. यापैकी ३१ तारखेला माजी मुख्यमंत्री आणि उबाठा गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम सांताक्रूझच्या ‘हयात’ या पंचताराकित हॅाटेलात आयाोजित केला आहे. १ तारखेला इंडियाची बैठक होणार आहे. त्यासाठी मुंबईत देशातील वेगवेगळ्या पक्षांच्या ६० नेत्यांचे आगमन होत आहे. कॅांग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी या देखील मुंबईत याच बैठकीसाठी येत आहेत. मात्र स्नेहभोजनाच्या आधीच सुग्रास भोजनात मीठाचा खडा पडण्याची भिती निर्माण झाली आहे.
गुरूवारी मुंबईत येताच संध्याकाळी कॅांग्रेस नेते राहुल गांधी ‘हयात’मध्येच गौतम अदानी यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत आहेत. गौतम अदानी यांनी स्वतःच्याच कंपनीचे शेअर विकत घेऊन स्टॅाक एक्सेंज मध्ये लाखो डॅालर्सना गुंतवण्याचे ‘उद्योग’ केले आहेत. हा प्रकार त्यांनी २०१३ ते २०१८ काळात केलाय असं वृत्त एका डिजीटल मिडीयाने दिलं आहे. त्यामुळे अदानी वादात आले आहेत. याबाबत कॅांग्रेसची भूमिका राहुल गांधी मांडणार आहेत. राहुल यांनी ‘इंडिया’ च्या पार्श्वभूमीवरून असा विरोध करू नये अशी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची इच्छा आहे. तसेच उध्दव ठाकरे यांनाही मोदींव्यतिरिक्त कोणालाच विरोध होऊ नये असे वाटत आहे.य. ‘इंडिया’ बैठकीचे व्यासपीठ वापरून अदानी विरोध झाल्यास त्याचा वेगळा संदेश उद्योग जगतात जाईल याची या नेत्यांना भिती वाटत आहे. गौतम अदानी यांनी गेल्या काही दिवसांत शरद पवार यांची तीन वेळा भेट घेतली होती. तर मुख्यमंत्री पद गमावल्यावरही मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरेंना भेटले होते. शरद पवार आणि गौतम अदानी यांची दोस्ती ही मोदी- अदानींच्या दोस्तीच्या आधीची आहे. त्यामुळे शरद पवार हे अदानींच्या हिताला बाधा येऊ देत नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही अदानींचे व्यवसाय व्यवस्थित सुरू होते. मात्र आता कॅांग्रेस नेते राहुल गांधींनीच अदानी विरोधी पवित्रा घेतल्या मुळे शरद पवार नाराज झाले आहेत. शरद पवारांच्या नाराजीचा फटका ‘इंडिया ‘ला बसू नये याकरता नेत्यांची धावाधाव सुरू झालीय. यामुळे मुंबईतील कार्यक्रमाचे संयोजक असलेले शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अधिक धास्तावला आहे.
हे ही वाचा:
Asia Cup 2023, भारतीय टीमला मोठा झटका, केएल राहुल संघाबाहेर ‘या’ खेळाडूला मिळणार संधी…
बच्चू कडू यांनी केली Sachin Tendulkar कडे मागणी