उद्धव सेनेने उदय सामंत हे शिंदे गोटात बंड करणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे एकाच खळबळ उडाली होती. तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिंदे आणि आपल्यात भांडणं लावण्याचा पोरखेळ असल्याचे म्हटले आहे. तर उद्धव ठाकरे सेनेला खिंडार पडणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटले आहे. दावोस दौऱ्यावरून परतताच त्यांनी उद्धव ठाकरे गटाला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभेतील मोठ्या पराभवानंतर उद्धव सेनेतील अनेक नेते शिंदे गटाकडे येणार असल्याचाही दावा उदय सामंत यांनी केला. उद्धव ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी होतील. तर उद्योग मंत्री उदय सामंत आज रत्नागिरीतून पहिला ट्रेलर दाखवणार असल्याचे ते म्हणाले. केवळ उद्धव सेनेलाच नाही तर काँग्रेसला पण झटका दाखवणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आज रत्नागिरीत पक्ष प्रवेशाची जय्यत तयारी सुद्धा सुरु केली आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत आज २४ जानेवारीला रत्नागिरीतून पहिला ट्रेलर दाखवणार आहेत. रत्नागिरीतून आज उद्योग मंत्री उदय सामंत उद्धव ठाकरे सेनेला खिंडार पडणार आहेत. उद्धव ठाकरे सेनेतील जवळपास साडेचारशे ते पाचशे कार्यकर्ते उद्धव ठाकरे सेनेला रामराम करणार आहेत. तालुकाप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, सरपंच, उपसरपंच अशांचा आज १२ वाजता पक्षप्रवेश होणार आहे.
उद्धव ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, उपविभाग प्रमुख दत्ता तांबे, विभाग प्रमुख आप्पा घाणेकर, पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, विभाग प्रमुख महेंद्र झापडेकर यांचा आज शिंदेसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या नेत्याचा आज पक्षप्रवेश नाही.
हे ही वाचा :
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .