देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा होईल. तर आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून बाकीचे मंत्री अशी भाजपचे नेते सुधीर मनुगंटीवार यांनी दिली. भाजपकडून शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. तिन्ही पक्षाचा उल्लेख असलेली निमंत्रण पत्रिका भगव्या रंगात, निमंत्रण पत्रिकेवर ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी’ असा उल्लेख करण्यात आलं आहे. शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली असून देशभरातील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
महायुतीच्या आजच्या शपथविधी सोहळ्याला १९ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांना देखील निमंत्रीत केले जाणार आहे. तर केंद्र सरकारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह महत्वाचे केंद्रातील पाच मंत्री देखील या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
राजशिष्टाचारनूसार देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. याप्रमाणे माजी मुख्यमंत्री असल्याने उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. तर महाराष्ट्रातील शरद पवार राज्यसभा सदस्य असल्याने त्यांनाही आजच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देखील निमंत्रण दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तसेच प्रत्येक जिल्ह्यातून २९ पदांवरील पदाधिकारी लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य बोर्ड, महामंडळ, आयोग अध्यक्ष, माजी खासदार, केंद्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, विभाग संघटन मंत्री, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य, निमंत्रित सदस्य, लोकसभा कोअर कमिटी, लोकसभा निवडणूक प्रमुख विधानसभा निवडणूक प्रमुख, विधानसभा संयोजक, जिल्हाध्यक्ष- महामंत्री, मुंबई पदाधिकारी व मोर्चा पदाधिकारी, देशमुख मोर्चा पदाधिकारी, प्रदेश प्रकोष्ट पदाधिकारी, जिल्हा मोर्चा अध्यक्ष, प्रदेश प्रवक्ते मंडळ, अध्यक्ष व महामंत्री मनपा, जि प, पं समिती, नगरपरिषद व नगरपंचायत सदस्य २०१७ पासून पुढील बाजार समिती सभापती व उपसभापती २०१७ पासून पुढील जिल्हा बँक व सहकारी बँक संचालक/ भाजप पदाधिकारी सर्व प्रकोष्ट जिल्हा संयोजक, विधानसभा ,विस्तारक,जिल्हा संवादक, यांना निमंत्रण देण्यात आलं आहे .
हे ही वाचा:
मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच Devendra Fadnavis यांनी केले पहिले भाषण; म्हणाले,”पुढची वाट अपेक्षा…”