महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे आमदार उदय सामंत कोणत्याही क्षणी भाजपचा हात पकडू शकतात. यात शिवसेना ठाकरे पक्षाचे ४ आमदार आणि ३ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आहेत. तसेच काँग्रेसचे ५ आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी केला आहे. सामंत हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. तिथूनच त्यांनी एक मोठा दावा केला आहे. आता याच मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार देत प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “उद्योगमंत्री उदय सामंत गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेत किती आमदार, खासदार फुटतील हे दावोसमधून सांगत आहेत. दावोसमध्ये बसून एकनाथ शिंदेंना कोण भेटलं, तीन खासदार भेटले, दहा आमदार भेटले, हे गुंतवणूक करत आहेत का? त्यांना मुख्यमंत्र्यांनी परत पाठवले पाहिजे.”
पुढे संजय राऊत म्हणाले, ” मुळात दावोस हा काय राजकारण करण्याची जागा आहे का ? तुम्ही स्वतः फुटला ना,तुमच्या कपाळाला बेईमानीची पट्टी लागली आहे. आता फक्त संजय राऊत आणि आदित्य ठाकरे, सुनील राऊत हे एकनाथ शिंदेंना भेटले, एवढंच सांगायचे राहिले आहे. त्यांना दुसरे काय काम आहे? तुम्ही सरकारी खर्चाने तिथे गेलात, त्यावर लाखो डॉलर्स खर्च करत आहात. मात्र तुम्ही उद्योग वाढवण्यापेक्षा शिवसेना राष्ट्रवादीचे किती खासदार, आमदार फोडत आहेत, कसा धक्का देणार हे दावोसला जाऊन सांगत आहात, हे काय उद्योगमंत्र्याचे काम आहे का? त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उदय सामंत यांच्याकडून दावोसचा खर्च घेतला पाहिजे, अशी टीका करत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
हे ही वाचा :
Davos मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट, पहिला करार राज्यातील Gadchiroli साठी