आपला लढा मोदींविरुद्ध नाही त्यांच्या वृत्तीविरोधात आहे. हिंदुत्वाचा ठेका फक्त भाजपने नाही घेतला. अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. आजचा उत्साह दसरा मेळाव्यापेक्षा कमी नाही असेही ते यावेळी म्हणाले. हे लोक आपल्या मुंबईची पिळवणूक करतात. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी राहिली आहे का? यांनी मुंबईला ओरबाडून टाकलं आहे. भाजपकडून पक्ष फोडण्याचं काम सुरु आहे. तुम्ही वरवरचा फेस घेऊन गेलात, पण आमची मुळं अजून घट्ट आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोना काळात एकही मृतदेहाची विटंबना होऊ दिली नाही. राज्य सरकार खर्च करेल, बाहेरील राज्यांतील लोकांना घरी पाठवा अशी विनवणी केली होती. पण यांनी तेव्हा विरोध केला. शिवसेनेला संपवायला सगळे उभे, ज्यांना जायचंय त्यांनी जा. असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी नाव न घेता दिला.
शिवसेना आता काँग्रेस सोबत गेली म्हणजे आता काँग्रेस झाली, आधी भाजपसोबत होती तर भाजप झाली नव्हती. भाजपकडून पक्ष फोडण्याचं काम सुरु आहे. महाराष्ट्रात जर यांना कोणी रोखू शकणार असेल तर ती फक्त शिवसेना. शिवसेनेच्या जीवावर जे मोठे झाले त्यांनी शिवसेनेला आलेली फुलं तोडून नेली पण माझी मूळं घट्ट आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर यांनी शिवसेना (Shivsena) संपवायचा घाट घातला, कारण महाराष्ट्रात यांना कुणी जर रोखणारं असेल तरे ती शिवसेना आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केली. आता तर शिवसेना संपत नाही म्हटल्यावर ती चोरायला निघालेत, देशात इतर राज्यांत बुलेट ट्रेन का सुरु केली नाही? असंही ते म्हणाले. पंतप्रधानांनी १० वर्षात काय केलं? शेतकरी, शिक्षक, नोकरदार, विद्यार्थी यांना काय मिळालं? शरद पवारांना प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा :
जिनिलीया देशमुखने हाता-तोंडाला पट्ट्या बांधलेला हटके फोटो केला शेअर
Best Station Thane : मध्य रेल्वेच्या ४६६ स्थानकांतून ठरले अव्वल