Saturday, June 3, 2023

Latest Posts

‘सामना’तून भाजपवर हल्लाबोल, जयंत पाटील यांनी….

जयंत पाटलांच्या या सर्व चौकशीवरून आज दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून मोठा गौप्यस्फोट हा करण्यात आला आहे. तसेच भारतीय जनता पार्टीवर देखील जोरदार हल्लबोल हा करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी ने समन्स पाठवले होतं. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आले होते. या संदर्भात जयंत पाटील हे दिनांक २२ मे रोजी ईडी कार्यलयात उपस्थित होते. सकाळी ११ वाजता जयंत पाटील हे ईडी कार्यलयात पोहचले. आणि तब्बल ९ तास जयंत पाटील यांची चौकशी ही सुरु होती. त्यामुळे अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका ही घेतली होती. जयंत पाटलांच्या या सर्व चौकशीवरून आज दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून मोठा गौप्यस्फोट हा करण्यात आला आहे. तसेच भारतीय जनता पार्टीवर देखील जोरदार हल्लबोल हा करण्यात आला आहे.

आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून एक मोठा गौप्यस्फोट हा करण्यात आला आहे. तर भाजपवर देखील जोरदार हल्लबोल करत म्हंटले आहेत की, जयंत पाटील यांनी भाजपची गुलामगिरी नाकारली. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळेच त्यांना ईडीचं बोलावणं आलं. तसेच पुढे म्हंटल आहे की, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावं असा त्यांच्या वर दबाव होता. तशी राजकीय वर्तुळात चर्चाही होती. पण जयंत पाटील यांनी हा प्रस्ताव नाकारल्याने त्यांना ईडीचे बोलावणे आले. ईडीने अनेकांच्या बाबत असेच केले, असा दावाही या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

जयंत पाटील यांची नऊ तास चौकशी झाली. ते घरी गेले. त्यांना सुखाने झोप लागली असेल. निर्भय लोकांनाही सुखाची झोप लागते. हर्षवर्धन पाटील आणि संजय काका पाटील हे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनाही सुखाने झोप लागली. काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याने त्यांच्यावरील ईडीचं बालंट टळलं, असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे. आयएएल अँड एफएस या कंपनीच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने जयंत पाटील यांची चौकशी केली. ते ही माहिती लेखी स्वरुपातही मागवू शकले असते. पण एखाद्याला त्रास द्यायचा म्हटला की सभ्यता गुंडाळून ठेवली जाते. या कथित घोटाळ्यातील लोक भाजपशी संबंधित लोकही असू शकतील. पण त्यांना चौकशीला बोलावलं जात नाही, असा हल्लाबोल दैनिक ‘सामना’तून करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

मुंबईकरांसाठी खुशखबर! ताडदेव, दादरसह अनेक ठिकाणी म्हाडाच्या घरांच्या सोडती

Jayant Patil यांची आज ED चौकशी, मुंबई कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

या देशाला एक लहरी राजा मिळाला, संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss