Saturday, April 20, 2024

Latest Posts

Ed कार्यालयात जाण्यापूर्वी जयंत पाटलांची प्रतिक्रिया, काही गोष्टी सोसाव्या….

आज दिनांक २२ मे २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहे.

आज दिनांक २२ मे २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. सकाळी १०. ३० च्या सुमारास ते ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. त्या आधी ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले मग पुढे ईडी कार्यालयात गेले. या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच जयंत पाटील यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना जयंत पाटलांनी जोरदार टीका ही केली आहे. ते म्हणाले आहेत की, आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे काही गोष्टी सोसावा्या लागणारच आहेत.

ईडी कार्यलयात जाण्यापूर्वी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी बोलत असताना ते म्हणाले आहेत की, अनेक कार्यकर्ते हे मुंबईमध्ये येत आहेत. काही लोकांना वेगवेगळ्या टोलनाक्यावर थांबवण्यात आले आहे. सर्वांनी शांत राहावं. मला जे काही विचारलं जाईल त्याची उत्तरं दिली जाणार आहेत. चिंतेचं काही कारण नाही. सर्वांनी शांतता राखा, असं सांगतानाच आपण विरोधी पक्षात आहोत. काही गोष्टी सोसाव्या लागणारच ना. सर्व कसं सहसासहजी होईल? काही गोष्टी होतच असतात. त्यामुळे त्याला तोंड द्यायचं असतं, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आले होते. जयंत पाटील याना जी पहिली नोटीस पाठवण्यात आली त्या दिवशी नेमका त्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील होता. या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे ईडी कार्यालयात हजर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. जयंत पाटील यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाबाहेर आक्रमक भूमिका घेतली आहे. संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. तसेच जयंत पाटील हे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. तसेच संपूर्ण राज्यात देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

जयंत पाटील यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे असा आरोप करत राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहे. तर पुणे, मुंबईसह छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात देखील कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी ईडी आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली आहे. तर ‘सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है’ अशा घोषणा यावेळी देण्यात येत आहे. तसेच ‘जवाब दो मोदी सरकार जवाब दो’ असे फलक आंदोलनाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

मुंबईकरांसाठी खुशखबर! ताडदेव, दादरसह अनेक ठिकाणी म्हाडाच्या घरांच्या सोडती

Jayant Patil यांची आज ED चौकशी, मुंबई कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

या देशाला एक लहरी राजा मिळाला, संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss