Wednesday, April 24, 2024

Latest Posts

जयंत पाटील यांना ईडीने दिला दुसऱ्यांदा समज

आयएल आणि एफएस (IL & FS) प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीनं (ED Notice) दुसऱ्यांदा समज बजावलं आहे. २२ मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना देण्याचे या पात्रातून नमूद करण्यात आले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जयंत पाटील यांना गेल्या गुरुवारीच हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितली. त्यांची विनंती मान्य करत ईडीनं त्यांना एक आठवड्यानं म्हणजेच २२ मे रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे.जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावी अशी विनंती जयंत पाटील यांनी केली होती, अखेर ईडीने त्यांची विनंती मान्य केली.

ईडीने याअगोदर समन्स बजावत जयंत पाटील यांना चौकशीसाठी १५ मे रोजी हजर राहण्याचे आदेश नोटीसीमधून देण्यात आले होते. मात्र जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावे या बाबतचे पत्र जयंत पाटील यांनी ईडीला पाठवत चौकशीसाठी मुदत मागितली होती. अखेर ईडीने त्यांची विनंती मान्य करत २२ मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे.११ मे रोजी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी मला नोटीस मिळाली. त्यात काय उल्लेख आहे. मी नीट वाचले नाही. असे जयंत पाटील यांनी सांगितले. नोटीस मुंबईच्या घरात एका हवालदाराने आणून दिली आहे. माझ्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ आहेत. त्यामुळे त्यांनी तारीख दिली असली तरी मी हजर होऊ शकत नाही. त्याविषयो मी वेळ मागून घेणार आहे. परंतु या प्रकरणात माझा काडीचा संबंध नाही. कारण, मी कथित कंपनीशी रुपयाचा व्यवहार केलेला नाही. मला कर्ज काढायला आवडत नाही. कर्ज काढावे, असं माझं धोरण नसतं. त्या कंपनीच्या दारात कधी गेलेलो नाही. मला नोटीसची चिंता नाही. मी कोणत्याही दबावाशिवाय काम करतो अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

हे ही वाचा : 

कर्नाटक निवडणुकीच्या आधारे २०२४मध्ये लोकसभा आणि विधानसभेत लोक भाजपाच्या विरोधात निकाल देतील – रोहित पवार

अहमदनगरच्या शेवगावमध्ये दोन गटांत राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss