आज पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन पार पडला. त्यावेळी राज ठाकरे यांनी जिजाऊंचा जन्म दिवस महिला दिन म्हणून साजरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. 21 जून हा सर्वात मोठा दिवस नाही. कारण महिला दिन हा सर्वात मोठा दिवस आहे. हा दिवस 8 मार्चला सुरु होतो आणि पुढच्या वर्षीच्या 7 मार्चला हा दिवस संपतो. इतका हा मोठा दिवस आहे. हे ज्याचं लग्न झालंय, त्यांना चांगला ठाऊक आहे. मुळात जिजाऊंचा जन्म दिवस हा महिला दिन म्हणून साजरा व्हायला हवा असे राज ठाकरे म्हणाले.
सर्वात पुढारलेल्या स्त्रिया महाराष्ट्रात
सर्वात पुढारलेल्या स्त्रिया महाराष्ट्रात भेटतील. नुसत्या महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन काय करणार आहात? यातून तुम्ही काय बोध घेतलाय का? आपण 19 वर्षात काय केलं? आज असंख्य पक्षांना प्रश्न पडलाय. ह्यांना फक्त मतं मिळतात, ना कोणी आमदार ना कोणी खासदार तरी ह्यांचे कार्यकर्ते एकत्र कसे राहतात असेही राज ठाकरे म्हणाले. आज राजकीय फेरीवाले फिरतायेत, या फुटपाथवरुन डोळा मारला की तो दुसऱ्या फुटपाथवर जातो. आपण असले फुटपाथ बांधणार नाही तर आपल्याला निष्ठवंतांसाठी पर्मनंट दुकान थाटायचं आहे असेही राज ठाकरे म्हणाले.
पदावरून हकालपट्टीही करणार
आपल्या कामकाजाचा लेखाजोखा केला जाणार आहे. प्रत्येक 15 दिवसाला आढावा घेणार आहे. जर पदाधिकाऱ्याने कामचुकारपणा केल्याचं आढळलं तर मी पदावरुन हकालपट्टी करणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. मग त्याला ज्या फुटपाथवर जायचं आहे, त्या फुटपाथवर त्याने जावं असेही राज ठाकरे म्हणाले.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा
काही पदाधिकारी बैठकीला गैरहजर होते, कुठं गेले तर प्रयागराजला गेले म्हणे, कशाला तर त्या गंगेत पाप फेडायला गेले. पण अशा पाण्यात, मला म्हटलं तुम्ही पाणी घ्या, मी म्हटलं हट, असलं पाणी, अरे त्यात काय-काय होतंय. आमचे बाळा नांदगावकर आले, राज साहेब हे बघा. मी म्हटलं अरे कशी झालीये ती गंगा, नदी अस्वछता हा कळीचा मुद्दा आहे. आता तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा असेही राज ठाकरे म्हणाले.
गुढी पाडव्याला मी दांडपट्टा फिरवणार
मी आज फार काही बोलणार नाही, आज शुभेच्छा देणार आहे. कारण गुढीपाडव्याला बोलणार आहे. आता गुढी पाडव्याला मी दांडपट्टा फिरवणार आहे, त्यामुळं मी आज कशाला चाकू अन सुरे काढू असेही राज ठाकरे म्हणाले. आज महाराष्ट्राचा चिखल झालाय, हे राजकारणी मतांसाठी एकमेकांची डोकी फोडायला लावतायेत. आग लावतायेत, मात्र हे राजकारण्यांच्या लक्षात का येत नाही? हा खरा प्रश्न असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा :
Rahul Gandhi: पक्षातील गटबाजीवर राहुल गांधी यांची तीव्र नाराजी
Follow Us