Saturday, April 20, 2024

Latest Posts

जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली सडकवून टीका

कर्नाटक निवडणुकीनंतर राज्यात अनेक नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कर्नाटक राज्याचा निकाल हा काँग्रेस साठी महत्वाचा निर्णय तर होताच मात्र महाराष्ट्रासाठी देखील भाजप सरकारला चांगलीच चपराक होती.

कर्नाटक निवडणुकीनंतर राज्यात अनेक नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कर्नाटक राज्याचा निकाल हा काँग्रेस साठी महत्वाचा निर्णय तर होताच मात्र महाराष्ट्रासाठी देखील भाजप सरकारला चांगलीच चपराक होती. भाजप पक्षाला वाटत होते आपणच सर्व राज्यात वर्चस्व आहे मात्र असे झाले नाही आणि काँग्रेस ने सुरवातीपासूनच आपली जागा धरून बसली होती. तसेच राज्याच्या राजकारणात कर्नाटकचा निकाल हा काँग्रेसच्या बाबाजूने लागल्याने काँग्रेससाठी महाराष्ट्रात सत्ता येऊ शकते अशी अशा वर्तवली जाऊ शकते . तसेच जय प्रकारे भाजपने कुरखोडी आणि आमदार फोडण्याचा प्रयत्न केला परंतु कर्नाटकात कोणीही दाद दिली नाही त्यामुळे काँग्रेसला आशा आहे की, महाराष्ट्रात देखील असे काही तरी होऊ शकते. तर कर्नाटक निवडणूक या संबधी निकाल ही भाजपाच्या पार्श्वभागावर मारलेली लाथ आहे. लोकांना सूडाचं राजकारण आवडत नाही. त्यामुळे मतपेटीतून आपला राग लोकांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटकपेक्षा वाईट अवस्था महाराष्ट्रात होईल अशा शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नाहीतर तर ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत. ठाण्यात ते दडपशाही करत आहेत असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.काही वेळापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर कडाडून टीका केली आहे. महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक होईल तेव्हा भाजपाची अवस्था कर्नाटकपेक्षा वाईट अवस्था होणार आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं आहे.

१३ मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात काँग्रेसचा विजय झाला आहे भाजपाला दारुण पराभव झाला. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही भाजपावर कडाडून टीका केली आहे.जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांना पाच जिल्ह्यांतून तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. हेमंत वाणीही तडीपार होतील अशीही माहिती समोर येतं आहे. या कारवाईमुळे ठाणे महापालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या पाठिशी राज्य सरकार आहे असाही आरोप होतो आहे. यावरूनच मुख्यमंत्री दडपशाही करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी – नितेश राणे

बिग बी यांना बसला जबरदस्त दंड; पोलिसांनी केली कारवाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss