Tuesday, June 6, 2023

Latest Posts

जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेंना एका वाक्यात लगावला टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शाब्दिक वार सुरूच असतात. आणि त्यांच्या मध्ये गेल्या काही दिवसापासून राजकीय वैर देखील निर्माण झाल्याचेआपल्याला वारंवार सभेमधून दिसून येते.सभेच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड एकमेकांवर शाब्दिक वर हे करतच असतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शाब्दिक वार सुरूच असतात. आणि त्यांच्या मध्ये गेल्या काही दिवसापासून राजकीय वैर देखील निर्माण झाल्याचेआपल्याला वारंवार सभेमधून दिसून येते.सभेच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड एकमेकांवर शाब्दिक वर हे करतच असतात. जितेंद्र आव्हाड सातत्याने एकनाथ शिंदे यांना सवाल करत आहेत. मात्र काल शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर सभागृहात ताशेरे ओढलेले बघायला मिळाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झोपडपट्टी धारकांविषयी मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी धारकांना स्वतःचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्या देशातील झोपडपट्टी कमी होण्यास मदत होईल. मात्र हा निर्णय दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय हा चांगलाच आहे असे वक्तव्याजितेंद्र आव्हाड यांनी केले. आणि त्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडांवसांचे अभिनंदन देखील केले. आता झोपडी विकण्यासंबंधीचाही निर्णय त्यांनी घ्यावा अशी मी विनंती त्यांना करतो असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाहि टोलाही लगावला आहे. नालेसफाई आणि कचरा हे ठाण्यातल्या सत्ताधाऱ्यांचं खाण्याचं कुरण आहे. ते कचराही खातात आणि नाल्यातूनही पैसा खातात असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

काल सभागृहामध्ये जितेंद्र आव्हाड नसताण त्यांच्या विषयी एक मुद्दा उखरून काढाल गेला. वास्तविक हा विषय एकनाथ शिंदे यांना सभागृहात काढण्याची काहीच गरज नव्हती. तरी देखील त्या मुद्द्याला हात घालून एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांवर ताशेरे ओढण्यास सुरवात केली. एकनाथ शिंदे यांनी आव्हाडांविरुद्ध असलेल्या गुन्ह्यातील फोटो सभागृहात दाखवला. दरम्यान यावर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. यांच्याकडे नैतिकता उरलेली नाही. ती नैतिकता फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडे होती असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

कारमुसे प्रकरणात हात घालून मुद्दामून विषय उचलून धरून एकनाथ शिंदे हे जितेंद्र आव्हाडांवर टीका करत आहेत. कारमुसे प्रकरणात मुख्य न्यायालयाने नाकारले मग तो माणूस सर्वोच्च न्यायालयात गेला, सर्वोच्च न्यायालयात त्याचे वकील कोण कोण होते यांची यादी काढा मग तुम्हाला समजेल हा पैसा कुठून आला, जो अधिकारी चौकशी करत होता यासंबधी पूर्ण माहिती पुन्हा काढली जात आहे. म्हणजे एकंदर काय तर मला संपवण्यासाठी ना नाना परीचे उपयोग केले जात आहे हे यावरून सिद्ध होत आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. परंतु मी आता असे सांगू इच्छितो, मी असल्या केसेसना घाबरत नाही. मला संपवण्यासाठी इतक्या करामती मुख्यमंत्र्यांना कराव्या लागत आहेत त्यामुळे मी खुश आहे असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. सत्तेचा गैरवापर हे सरकार करत आहे. अनेक शिवसैनिकांची घरं-दारं उध्वस्त केली. तेव्हा कायदा, न्याय व्यवस्था काहीच दिसलं नाही. केवळं मालकाची पत्नी उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर दिसली म्हणून हॉटेल तोडणारे आज आम्हांला कायदा व सुव्यवस्था शिकवायला सभागृहात बोलत होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदे याना थानकावीं सांगितले की ,मला फसवण्याचे १०० प्रयत्न करतील. पण मी गप्प बसणाऱ्यांमधला माणूस नाही. ज्या कोर्टाने सांगितलं की एकनाथ शिंदे यांची निवड अवैध आहे, त्यांची मुख्यमंत्रीपदाची निवडच अवैध आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगिलं की माझी माणसंच निघून गेली आहेत तर मी कशाला मुख्यमंत्री राहू? त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं. इथे सर्वोच्च न्यायलायने सांगितलं आहे की एकनाथ शिंदे यांची निवड अवैध आहे तरीही ते पद सोडत नाहीत असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीला मोठा धक्का!, १५ नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संसद भवनाच्या नवीन बिल्डिंगचे उदघाटन आणि त्याचवेळेस करणार …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss