संतोष देशमुख हत्या प्रकरण हे राज्यात चांगलेच गाजले आहे. संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्याकारण्यात आली. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हा मूळ आरोपी आहे, याला अटक करा आणि धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करत बीड मध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात विविध पक्षाचे नेते उपस्तिथ होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्लबोल केला आहे.
काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड
तुम्ही दाऊदला फरफटत अणणार होते. मग वाल्या कराडला आणायला काय हरकत आहे? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मी आका काका म्हणणारा नाही, मी थेट मुंडे यांचे नाव घेतल्याचे आव्हाड म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा आरोपी आहे, मात्र अद्याप जाणीवपूर्वक त्याच्यावर कारवाई होत नाही आहे. लोकांची मेमरी शॉर्ट आहे. लोकं विसरून जातील. याची ते वाट पाहत आहेत असेही आव्हाड म्हणाले.
पुढे ते म्हणाले, संतोष देशमुख हत्याप्रकरणी 302 चा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यामुढे वाल्मिक कराडचे नाव नसल्याचे आव्हाड म्हणाले. सभागृहात तुम्ही सांगून देखील या प्रकरणात अद्याप काही कारवाई नाही असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. अजित पवार यांनी अद्यापपर्यंत कोणतीच जबाबदारी घेतली नाही असेही आव्हाड म्हणाले. उलट सभागृहात अजित पवार यांनी सुरेश धस यांना डोळा म्हणत खुणवत होते असे आव्हाड म्हणाले. त्यांचा उद्देश काय होता हे मला माहित नाही असे आव्हाड म्हणाले. अण्णा हजारेंनी आरोप केल्यावर पवारसाहेबांनी सुरेश जैन, नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, विजयकुमार गावीत यांचे राजीनामे घेतले होते असे आव्हाड म्हणाले.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका