spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Jitendra Awhad on Actor Rahul Solapurkar: इतिहासाचे विकृतीकरण करणारा कोण हा…? अभिनेत्याच्या वक्तव्यावर आव्हाडांची घणाघाती टीका

अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलेल्या भाष्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र उगारले आहे.

अभिनेते राहुल सोलापुरकर (Actor Rahul Solapurkar) यांनी एका यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे आता राजकीय विश्वात गदारोळ माजला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पेटारे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावेही इतिहासात आहेत. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की, थोडे रंग भरून सांगावा लागतो. पण, रंजकता आली की, इतिहासाला छेद दिला जातो, असे खळबळजनक वक्तव्य अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केले आहे.

अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलेल्या भाष्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टीकास्त्र उगारले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हा राहुल सोलापूरकर काय बोलतोय? ही हिंमत ह्यांच्यात येते कुठून? असा सवाल विचारत राहुल सोलापुरकर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल, असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :

CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?

Konkan Hearted Girl अंकिता प्रभू वालावलकरने नवऱ्यासह Raj Thackeray ना दिले लग्नाचे खास आमंत्रण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

Latest Posts

Don't Miss