Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. यावरून, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यावरून मोठे भाष्य केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभेच्या निकालावर ते म्हणाले, “अनपेक्षित असा निकाल आहे. महाराष्ट्रात सगळेच बोलत आहेत फक्त आम्हीच नाही. महाराष्ट्रातील जमिनीवरची परिस्थिती आणि लागलेले निकाल यात १०० टक्के अंतर आहे, असं महाराष्ट्रातील जनताच म्हणते. लोकांना संशय आहे. आम्ही अजून ईव्हीएमवरती काहीच बोललेलो नाही. आम्ही कशावरच काही बोललो नाही. ज्या आमच्या सभा झाल्या त्यात लाखो लाखो लोक आली होती, तिथे आम्हाला स्पष्ट दिसत होतं.”
ते पुढे म्हणाले, ” मी महारा्ष्ट्राचा आतापर्यंतचा इतिहास वाचून दाखवतो असं कधी संयुक्त महाराष्ट्राची निवडणूक झाली, चळवळीची तेव्हा कधी असं झालं नाही. 1977-80 साली असं कधी झालं नाही. 89 सालीही नाही, असा निकाल महाराष्ट्राच्या इतिहासात कधी लागला नाही. विरोधी पक्ष, नेते ताकदीने लढले, सत्ताधारी पण ताकदीने लढले. पण विरोधी पक्षाला समान उमेदवार मिळाले, ही आर्श्चयाची बाब आहे.”
“स्थानिक निवडणूका आता लगेच घेतील. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. त्यानंतर आज पर्यंतच्या निवडणूकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी अशी काही निवडणूक जिंकली नाही की विरोधीपक्ष फार धुळीस मिळाला आहे. त्यावेळी काँग्रेस सत्ताधारी होती पण त्यांनी विरोधी पक्षासोबत अशी कधी निवडणूक जिंकली नाही. शरद पवार लोकांच ऐकूण घेत आहेत, त्यांनंतर ते बोलतील,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”