राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच आता राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्या करू लागले आहेत. अश्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार असल्याची घोषणा केली. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ‘पहिल्यांदा मुंब्र्यात मंदिर उभारा,’ असे वक्तव्य केले होते. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी आज (बुधवार, ६ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले, “देवेंद्र फडणवीस कधी मुंब्र्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांना मुंब्र्याची रचना माहीत नाही. मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावर शिल्प आहे. ऐतिहासिक देवी मुंब्रा देवी मुंब्र्यात आहे. मला शासनाची परवानगी द्या, जागा द्या, पुतळा द्या मी पुतळा उभारतो. उद्धव ठाकरे यांना उद्घाटनाला बोलवतो. का एखाद्या शहराला, का एका धर्माला बदनाम करायचे? आणि ते कोणाचे तरी शत्रू आहेत असं दाखवायचे. शिवाजी महाराज मुसलमानांचे शत्रू नव्हते. मदारी मेहतर का गेला शिवाजी महराजांसोबत? तो तर मुसलमान होता. मी त्या ठिकाणचे प्रतिनिधित्व करतो जिथे ५० टक्के मुस्लिम आहेत, ५० टक्के हिंदू आहेत.”
राहुल गांधींवर फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत आव्हाड पुढे म्हणाले, “हेच संविधान आहे जे राहुल गांधी यांनी दाखवले होते. लाल रंगाचा अर्थ काय होतो प्रेम, हृदय, क्रांतीचा रंग लाल आहे. आमचं रक्त सळसळत आहे कारण तुम्ही संविधान बदलणार म्हणून या संविधानाचा रंग लाल आहे. हृदयाचा रंग लाल आहे. त्याचा काय नक्षलवाद्यांशी काय संबंध?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
Devendra Fadnavis यांचे Rahul Gandhi यांच्यावर टीकास्त्र; म्हणाले,”मग लाल संविधान कशासाठी?”
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर