spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

तुम्हाला असं बोलताना लाज कशी वाटली नाही? Sharad Pawar यांच्यावरील टिकेवरून Sadabhau Khot यांच्यावर Jitendra Awhad संतप्त

जत विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ आज (बुधवार, ६ नोव्हेंबर) महायुतीकडून जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार प्रहार केला. शरद पवारांना महाराष्ट्राचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का? अश्या शब्दांत त्यांनी टीका केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सदाभाऊ खोत यांना चांगलेच सुनावले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधत सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका केली. ‘शरद पवारांबद्दल असं बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही?’ असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नेमकं काय म्हणाले आव्हाड?

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सदाभाऊ खोत तुम्हाला शरद पवारांबद्दल बोलताना लाज कशी वाटली नाही? चौथ्या स्टेजचा कँसर असल्यामुळे त्यांचा जबडा काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी त्यांचं ऑपरेशन झालं. त्याच्या काही दिवसानंतर लगेच शरद पवार रक्त येत असतानादेखील सभांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आपण काय बोलतो याची समज नाही का आपल्याला? महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही. शरद पवारांचा शंभर टक्के वाटा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची अक्कलशून्यता लक्षात येते. तुमची अक्कल धुळीला मिळालेली आहे. सदाभाऊ खोत तुम्ही तुमच्या वडिलांची अशी टिंगल केली असती का? तुमच्या चेहऱ्यावर डाग पडला तर घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल,” अश्या शब्दांत त्यांनी टीका केली.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?

आपल्या भाषणात सदाभाऊ खोत म्हणाले, “शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसवाले देवेंद्र फडणवीसांना रायला लागले आहेत. का माहितीये? कारण आपण शेतकरी माणसं आहोत. आपल्या घरात गाय असते. राज्याची तिजोरी म्हणजे हि गाय आहे. गायीची जी कास आहे, त्या कासेला चार थान आहेत, यामधील अर्ध थान वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला पाजायचं आणि साडेतीन थान दूध आपणच हाणायच. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, हि चारही थान मी वासरांनाच देणार. यानंतर शरद पवारांना नववा महिना लागला. पवारसाहेब म्हणाले, आता माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांच कसं होणार?”

“शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणला, पण एवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा…? महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार काय? गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे काम कोणी केले असेल ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणावरून Raj Thackeray यांचा Manoj Jarange यांना टोला; म्हणाले, “तुम्हाला लढायचे लढा नाही तर…”

अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss