spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

जितेंद्र आव्हाड यांची व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल, रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाड यांच्या व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल होत आहे. याबाबत स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर पोस्ट करत सदर चॅट खोटी असल्याचं स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाचे नेत्या रुपाली ठोंबरे यांच्या विरुधात गुन्हा देखील दाखल केला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

 

रुपाली ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे, सौरभ आघाव यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेलं चॅट एक्सवर पोस्ट करत आव्हाड कशाप्रकारे समाजात तेढ निर्माण करतात हे दाखवण्याचा रुपाली ठोंबरे यांचा प्रयत्न असल्याचं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

नेमकं काय आहे व्हायरल होणाऱ्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ?

उद्याचा माणसाला तयार ठेव शिवराज..मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे…मुंडेंविरोधात आणि वाल्या (वाल्मिक कराड) विरोधात जे जे असेल सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव…तुझा फोन लागत नाहीय सकाळपासून प्रयत्न करतोय, असा मेसेज आहे. तसेच मोर्च्यात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशांची काळजी करु नका…आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्याला ही संधी द्यावी, मी सांगितलं आहे, कसं काय कुणावर बोलायचं…कसा मंत्री राहतो आणि अजित (अजित पवार) याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता..असंही व्हायरल होणाऱ्या चॅटमध्ये म्हटलं आहे.a

व्हायरल झालेल्या चॅटवर काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड

माझी खोटी व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध मी काल बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला?, असं जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत म्हटले आहे. व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा आहे, याची संपूर्ण माहीती मी ट्वीटद्वारे दिली आहे. त्याचा वापर केला तर पोलिसांना, ‘ चौकशी सुरू आहे’, हे सांगण्याचे कारणच उरणार नाही. मी स्वतःच सर्व तांत्रिक बाबी माझ्या ट्वीटमध्ये सांगितलेल्या माहितीचा वापर केला तर पोलिसांना फक्त कारवाईच करायची आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss