रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत एकमत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांच्यापदाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासानंतरच अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. आता यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे.
पालकमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांना रायगडचे आणि दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले असून ते आपल्या दरे या मूळ गावी गेल्याच्या चर्चा रंगू लागल्या. यावर शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी गेले की लोकांना उगीचच असं वाटतं की ते नाराज आहेत. मला मुळात एक सांगायचं आहे की अशा बारीक सारीक कारणांवरून नाराज होऊन कुठेतरी असं निघून एकांतात जावं अशा पद्धतीच व्यक्तिमत्व हे एकनाथ शिंदे यांच अजिबात नाहीये. त्यांना आपल्या मातीची ओढ आहे, आपल्या गावाची ओढ आहे, शेतीची ओढ आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्या माणसांमध्ये आणि आपल्या शेतीच्या मातीमध्ये रमायला तिथे जातात त्यामुळे अशा पद्धतीच्या अफवा जर कोणी पसरवत असतील नाराजीच्या तर त्या चुकीच्या आहेत.”
पुढे रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदावरून ज्योती वाघमारे म्हणाले की, “तीन पक्ष जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये समन्वय साधत असताना काही गोष्टी होत असतात. आपण जेव्हा बघतो की एका कुटुंबामध्ये जर तीन भाऊ असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा कधी थोडेसे इकडच तिकडचं होतं. हा अगदी म्हणजे आमच्या तीनही पक्षांमध्ये जे नेते आहेत मला वाटतं की ते अतिशय समन्वय साधून आणि सामजस्यपणाने यावरती मार्ग काढतील. दादा भुसे हे शिवसेनेचं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी शिवसेनेचा एक मोठा व्यक्तिमत्व आहे. त्यांनी ज्या पद्धतीने राज्याची जबाबदारी पार पाडली त्यामुळे नक्कीच त्यांच्याही नेतृत्वाला न्याय मिळेल अशा पद्धतीची अशा एक शिवसैनिक म्हणून आम्हाला वाटतंय.
पुढे ते म्हणाले, “अंतर्गत नाराजी वगैरे अशा गोष्टी ह्या अगदी बाहेरच्या लोकांनी चालवलेले आहेत. पालकमंत्री पद किंवा इतर गोष्टी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आमचे तीनही नेते हे अतिशय सक्षम आहेत. उबाठाच्या बैठकीमध्ये भास्कर जाधव सांगताहेत की आता उबाटाची काँग्रेस झाली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की, “आम्ही स्वतंत्र लढणार तिसरीकडे पवार साहेबांचं काय चाललेल आहे त्यांचे नेते पुन्हा परत अजित पवारांकडे येत आहेत. उबाठाचे नेते अक्षरश वेटिंग लिस्टमध्ये आहेत, अनेक मोठे चेहरे हे महापालिका निवडणुकांच्या आधी आमच्याकडे येतील आणि एक प्रचंड मोठा भूकंप होईल.”
हे ही वाचा :
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला नाराजी नाट्यामुळे स्थगिती