Saturday, April 20, 2024

Latest Posts

Karnataka Assembly election 2023, ‘या’ पक्षांना मिळाली NOTA पेक्षाही कमी मतं

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व २२४ जागांचे कल जाहीर केले आहेत. या निवडणुकांमध्ये काही पक्षांना नोटा पेक्षाही कमी मतं ही मिळाली आहेत.

Karnataka Assembly election 2023 : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता ही सर्वांना लागली होती. संपूर्ण देशाचं कर्नाटकच्या निकालाकडे लक्ष हे लागले होते. परंतु कर्नाटकात काँग्रेसचा चांगलीच आघाडीवर असल्याचं चित्र हे दिसून येत आहे. काँग्रेसला बहुमत हे मिळाले आहे. एकीकडे काँग्रेसच्या कर्यकर्यांचा जल्लोष हा सुरु आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व २२४ जागांचे कल जाहीर केले आहेत. या निवडणुकांमध्ये काही पक्षांना नोटा पेक्षाही कमी मतं ही मिळाली आहेत.

दिनांक १० मे रोजी कर्नाटकात निवडणुका या झाल्या होत्या. तर आज १३ मे रोजी या निवडणुकांचे काळ हे समोर आले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, विधानसभा निवडणुकीत NOTA ला ०.६९ टक्के मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) ला ०.०२% मते मिळाली आहेत. बहुजन समाज पक्षाला (BSP) ०.२६% मते मिळाली आहेत. तर NOTA पेक्षा कमी मते मिळालेल्या पक्षात आम आदमी पार्टी, SP यांचाही समावेश आहे. आकडेवारीनुसार, आम आदमी पार्टीला ०.५७%, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (उपभासी) ०.०२%, CPI ०.०२%, JDU ०.००%, SP ०.०२% मिळाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडनुसार २२४ पैकी १२८ जागांवर काँग्रेस आघाडीवर असून राज्यात काँग्रेस सरकार स्थापन करत आहे. ट्रेंडनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. यानंतर भाजपला ६८ जागांवर आघाडी मिळाली आहे. कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार कनकापुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यापूर्वी ते जेडीएस नेते बी नागराजू आणि भाजप नेते आणि मंत्री आर अशोक यांच्या विरोधात २०,५०० मतांनी आघाडीवर होते.

दिनांक १० मे रोजी कर्नाटकात मतदान हे मतदान झाले आहे. आज दिनांक १३ मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Election Result 2023) निकाल हा लागणार आहे. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला टपाली मतमोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडल्या जातील. आज साधारणतः दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणुकीचे कल हाती येतील. तर बेळगावातील १८ मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होतील. त्यामुळे कर्नाटक कुणाच्या हाती जाणार? गुलाल कोण उधळणार? याचे चित्र स्पष्ट अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. राज्यात मतदानासाठी ५८,५४५ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या निवडणुकीत २,६१५ उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये २,४३० पुरुष तर १८४ महिला उमेदवार आणि १ तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ५.३१ कोटी मतदारांनी केला असून तो ईव्हीएम मशीनमध्ये बंद आहे. राज्यात ७३.१९ टक्के मतदान झालं.

हे ही वाचा:

Karnataka निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, जनतेने Narendra Modi आणि Amit Shah यांना झिडकारलं

Karnataka Election Results 2023, आमदारांना हलवले सुरक्षित ठिकाणी, तर नाना पटोलेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Karnataka Assembly election 2023 Result, पहिल्या अर्ध्या तासातच कर्नाटकातील चित्र स्पष्ट, काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss