Saturday, June 3, 2023

Latest Posts

Karnataka Assembly election 2023 Result, कर्नाटकात कुणाचा गुलाल उधळणार?, निकालाचं काऊंटडाऊन सुरू

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा अखेर फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे.

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा अखेर फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. दिनांक १० मे रोजी कर्नाटकात मतदान हे मतदान झाले आहे. आज दिनांक १३ मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Election Result 2023) निकाल हा लागणार आहे. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला टपाली मतमोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडल्या जातील. आज साधारणतः दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणुकीचे कल हाती येतील. तर बेळगावातील १८ मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होतील. त्यामुळे कर्नाटक कुणाच्या हाती जाणार? गुलाल कोण उधळणार? याचे चित्र स्पष्ट अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे.

राज्यात मतदानासाठी ५८,५४५ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या निवडणुकीत २,६१५ उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये २,४३० पुरुष तर १८४ महिला उमेदवार आणि १ तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ५.३१ कोटी मतदारांनी केला असून तो ईव्हीएम मशीनमध्ये बंद आहे. राज्यात ७३.१९ टक्के मतदान झालं. त्यामुळे सत्ताधारी भाजपची धाकधूक वाढली आहे. दक्षिणेकडील राज्यात कर्नाटक हाच एकमेव भाजपचा गड आहे. तोही हातचा गेल्यास भाजपच्या दक्षिणेतील अडचणी वाढणार आहेत.

 

तसेच कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या दोऱ्या कुणाकडे देणार आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये कर्नाटकात चुरशीची लढत होणार असली तरी जेडीएस या निवडणुकीत किंगमेकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एचडी कुमारस्वामी यांच्या जेडीएसच्या हाती सत्तेची चावी असेल. कुणाला सत्तेत बसवायचे हे जेडीएस ठरवणार असल्याचं चित्रं आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीतही जेडीएस किंग मेकर ठरली होती. त्यावेळी काँग्रेसने जेडीएसकडे कमी जागा असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं.

बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आज दुपारी दोन वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होतील अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. ही मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार असून कॉलेज परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

हे ही वाचा:

परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

सनस्क्रीनचा उपयोग केसांनाही होतो …… जाणून घ्या फायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss