Saturday, June 3, 2023

Latest Posts

Karnataka Election Results 2023, आमदारांना हलवले सुरक्षित ठिकाणी, तर नाना पटोलेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कीकडे निवडणुकांच्या निकालाची रणधुमाळी ही सुरु आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. तर या दरम्यान नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा निकाल हा अवघ्या काही तासांवर आला आहे. अवघ्या पहिल्या अर्ध्या तासतात कर्नाटकाचे चित्र हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असल्याचे दिसून येत आहे तर काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे. कर्नाटकाच्या या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हे लागले आहे. एकीकडे निवडणुकांच्या निकालाची रणधुमाळी ही सुरु आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. तर या दरम्यान नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

या वेळी माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले हे म्हणाले आहेत की, “सध्या बॅलेटमध्ये सुशिक्षितांचं मतदान आहे. परिवर्तन सुरू होत आहे. यावेळी जवळपास ४५ टक्के मतदान काँग्रेसला होणार आहे. त्यामुळे काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल. मागच्यावेळी काँग्रेसला जनतेने कौल दिला आणि त्याचाच फायदा घेऊन मोदी सरकारने जनतेच्या कौलाविरोधात जाऊन सरकार स्थापन केलं. भाजपा लोकशाही न मानणारा पक्ष आहे. त्यामुळे यंदा जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं आहे,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. तसेच नाना पटोले पुढे म्हणाले आहेत की, “भाजपाच्या सरकारने ५ वर्षात कर्नाटकच्या जनतेवर अत्याचार केले. ४० टक्के कमिशन हा या सरकारचा महत्वाचा भाग होता. ज्या लिंगायत समाजाच्या जोरावर भाजपा सत्तेत आली. त्या समाजाला वाळीत टाकण्याचं काम भाजपाने केलं. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सर्व समाज भाजपाच्या कामकाजावर नाराज होता,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

तसेच काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे. या सर्व उमेदवारांना हैद्राबाद ला हलवण्यात येणार आहे असे देखील समोर आले आहे. तर कर्नाटकमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठला आहे. यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. फटाके ढोल वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा:

Karnataka मध्ये Congress बहुमताच्या उंबरठ्यावर, राहुल गांधींचे सूचक ट्विट होतंय व्हायरल

Karnataka Assembly election 2023 Result, पहिल्या अर्ध्या तासातच कर्नाटकातील चित्र स्पष्ट, काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर

Karnataka Assembly election 2023 Result, कर्नाटकात कुणाचा गुलाल उधळणार?, निकालाचं काऊंटडाऊन सुरू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss