Saturday, June 3, 2023

Latest Posts

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरमय्या,उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार घेणार शपथ

कर्नाटकाचा निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागला. त्यानंतर कर्नाटकाचा मुख्यमंत्री नक्की कोण होणार यावर गेले आठवडाभर चर्च करण्यात आल्या. त्याच बरोबर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदी दोन्ही दावेदार हे योग्यच होते. त्यामुळे त्यांच्यात मक्की कोणत्या दावेदाराला मुख्यमंत्री बनवायचे हा पेच काँग्रेस पुढे उभा ठाकला होता.

कर्नाटकाचा निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागला. त्यानंतर कर्नाटकाचा मुख्यमंत्री नक्की कोण होणार यावर गेले आठवडाभर चर्च करण्यात आल्या. त्याच बरोबर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदी दोन्ही दावेदार हे योग्यच होते. त्यामुळे त्यांच्यात मक्की कोणत्या दावेदाराला मुख्यमंत्री बनवायचे हा पेच काँग्रेस पुढे उभा ठाकला होता. त्यामुळे कर्नाटक निवडणूक होऊनही अजून पर्यंत मुख्यमंत्री पदावर कोणाला निश्चित करायचे यावर बैठक घेतल्या गेल्या. सोनिया गांधी , राहुल गांधी यांच्या आणि बाकी कार्यकर्त्यांच्या बैठाका होऊन मुख्यमंत्री संबंधी कोणाचे नाव निश्चित करायचे हे ठरवून दुसऱ्या दावेदाराची समजूत काढून अंतिम निर्णय देण्यात आला. आणि सिद्धरामैय्या यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटकाची जनता हि खुश आहे. कर्नाटकमध्ये शनिवारी म्हणजेच आज दुपारी साडेबारा वाजता नवीन सरकारचा शपथविधी होत असून त्याची तयारी सुरू झाली आहे. शपथविधीपूर्वी काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळाची स्थापना आणि खातेवाटप या महत्त्वाच्या मुद्दय़ावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. तसेच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस आज सरकार स्थापन होणार हे तर नक्कीच होते. काँग्रेस नेते सिद्धरमय्या (Siddaramaiah) आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar) उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मंत्रिमंडळात सामील होणारे काही आमदारही शपथ घेणार आहेत. शपथविधी समारंभाच्या अगोदर, सिद्धरमय्या आणि शिवकुमार नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणार्‍या मंत्र्यांची नावे आणि खात्यांच्या वितरणाबाबत हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. काही तासांत मुख्यमंत्री म्हणून सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसकडून विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीला अद्याप जवळपास एक वर्ष बाकी असल्याने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या एकीचं प्रदर्शन म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पाहिलं जात आहे.

त्याच बरोबर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा बंगळुरूच्या श्री कांतीराव स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. या स्टेडियममध्ये सिद्धरमय्या यांनी २०१३ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतरच्या कार्यकाळानंतर सिद्धरमय्या आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल थावरचंद गेहलोत दुपारी १२. ३० वाजता कांतेराव स्टेडियमवर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. तसेच. शिवकुमार यापूर्वी सिद्धरमय्या यांच्या सरकारमध्ये मंत्री होते, ते पुढील वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकीपर्यंत कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील. तसेच या शपथविधी सोहळ्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, अनेक मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच नवीन मुख्यमंत्रांसमोर आता नव्या आणि जुन्या पिढीला एकत्र ठेवून त्यांच्या कडून पुढील कार्यकाळात त्यांच्या त्यांच्या योग्यतेच्या नुसार कशी कामे करता येतील आणि कर्नाटक राज्याचा कसा विकास योग्य रीतीने करता येईल असे आव्हाहन उभे ठाले आहे. येण्या काळात सिद्धरामैया त्याच्या कारकिर्दीत कोणते नवीन निर्णय घेतात या कडे सगळ्यांचे आणि मुख्यतः जयांच्यावर जबादारी देणाऱ्या जनतेचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्यात आमंत्रणासंबंधी संभ्रम

Thane मध्ये पुन्हा वाद!, शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर भिडले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss