spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

मंत्री धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्माची तक्रार; खरी माहिती दडवली; आज सुनावणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणावरून संपूर्ण राज्यच चांगलच वातावरण तापलं आहे. या हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली असून धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची राजनाम्याची मागणी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि विरोधक करत आहे. तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे विरोधात तक्रार केली होती. विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात खोटी माहिती दिली अशी तक्रार परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती. या तक्रारीवरून न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस धनंजय मुंडे यांना बजावली होती. याबाबत आज परळीच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नेमके आरोप काय ?

मंत्री धनंजय मुंडे यांनी २०२४ मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या उमेदवारी अर्जात सोबतच्या शपथपत्रात, पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करून शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. मात्र करून शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत उल्लेख कुठेच केला नव्हता. धनंजय मुंडे यांनी ही माहिती दडवल्याबाबत बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाइन तक्रार करुणा शर्मानी केली होती. तक्रारीची मूळ कागदपत्र पाच फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर दाखल केली. त्यांनतर न्यायालयाने नोटीस बजावत याबाबतची सुनावणी २४ फेब्रुवारी म्हणजेच आज होणार आहे. आता आज या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महिन्याला दोन लाख पोटगी

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणावरिल निकाल गुरुवारी (दि.6 फेब्रुवारी) वांद्रे कोर्टाने दिला. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्नी करुणा शर्मांना महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी, असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते. यानंतर विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी परळी कोर्टात धनंजय मुंडेविरोधात तक्रार दाखल केली होती.

MSRTC: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कर्नाटक संदर्भात महत्त्वाचे आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss