Friday, December 1, 2023

Latest Posts

काटेवाडीत १६ पैकी १४ जागांवर अजित पवार गटाची बाजी

बारामती (Baramati) तालुक्यातील अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीत अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) घवघवीत यश प्राप्त झालं आहे.

बारामती (Baramati) तालुक्यातील अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीत अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) घवघवीत यश प्राप्त झालं आहे. काटेवाडीत १६ पैकी १४ जागांवर अजित पवार गटाने बाजी मारली आहे. तर भाजपनं (BJP) पहिल्यांदाच काटेवाडीत शिरकाव केला आहे. भाजपने काटेवाडीत २ जागा जिंकल्या आहे.

काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गट पुन्हा बाजी मारणार की मतदार भाजपला संधी देणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली होती. अखेर बहुप्रतिक्षित काटेवाडी ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले. पवारांटं वर्चस्व असलेल्या काटेवाडीत यंदा भाजपचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळालं. काटेवाडीत पहिल्यांदाच भाजपनं दोन जागा जिंकल्या आहेत.

हे ही वाचा : 

Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व

Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss