spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान – नितेश राणे

मत्स्य व बंदर खात्याचे मंत्री नितेश राणे यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. हिंदुत्वाच्या विषयावर अनेकदा आमदार नितेश राणे यांनी वक्तव्य केले आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून अनेकदा वाद निर्माण झाले आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाले आहे. त्यांनी केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान असं म्हंटल आहे.

नेमकं काय बोललेत मंत्री नितेश राणे

आमच्या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचं रक्त भगवं आहे, ते कडवट हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे आम्हाला आता टोकाची भाषणे आणि कोणाला इशारा देण्याची गरज नाही असं नितेश राणे म्हणाले. आता आम्ही टोकाची भाषणे द्यायला लागलो, तर लोकच आम्हाला विचारतील तुमचे सरकार आहे, त्यामुळे आता आम्हाला असं काय करावं लागणार नाही” असं नितेश राणे म्हणाले.

पुढे ते बोलले, जो कायदा अन्य धर्मियांना लागतो, तोच कायदा हिंदू धर्माला लागतो. कायद्याच्या चौकटीत सगळं काम हेच आम्हाला अपेक्षित आहे. जे सगळे कायदे अन्य लोकांना लावता, तोच कायद्या आम्हाला लावा. अफजल खान वधाचा पोस्टर तुम्ही लावू नका, यातून भावना दुखवतील असा स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं असं नितेश राणे म्हणाले. ज्या देशात 85 टक्के हिंदू राहतात,आमच्या नसा नसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मग त्या महाराष्ट्रात त्या देशात आम्ही अफजलखानाच्या वधाचे पोस्टर लावायचे नाहीत ? मग पाकिस्तानमध्ये लावणार का ? असा सवाल त्यांनी केला.

अतिरेकी लोकांना धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत
चार-दोन टकल्यांच्या भावना दुखवणार असतील, तर मग त्यांनी पाकिस्तान, बांगलादेश येथे जाऊन दाढी कुरवाळावी. आमच्या राज्यात कोणीही गोहत्या करू शकत नाही, मग कायदा मोडत असेल, त्याबद्दल आम्ही भूमिका घाययची नाही का? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला. केरळ हे मिनी पाकिस्तान म्हणून राहुल गांधींची बहिण तिथे निवडून येते, सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. अतिरेकी लोकांना धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत” असा धक्कादायक आरोप नितेश राणे यांनी केला.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss