Khokya Bhosale MLA Suresh Dhas : सतीश भोसले उर्फ खोक्या, हा वाल्मिक कराडनंतर आता रडारवर आला आहे. वाल्मिकसारखीच दहशत पसरवण्याचे काम तो करत असल्याचे बोलले आहे. त्यातच आता त्याच्या घरी जनावरांचं मास व शिकारीसाठी लागणार साहित्य आढळून आल आहे. तर खोक्या भाई हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे सुरेश धसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलीस आणि वनविभागाकडून आज खोक्याच्या घराची छापेमारी करण्यात आली. त्यानुसार खोक्याच्या घरामध्ये पोलिसांना वाळलेलं जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य आढळून आलं आहे. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलं. दरम्यान शिरुर तालुक्यातील नागरिक आता चांगलेच आक्रमक झाले असून, उद्या शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे.
बीडमध्ये प्रत्येक टापूत एक दादा, भाऊ, भाई, आका आणि आकांचा आका समोर येत आहे. संतोष देशमुख यांची क्रूर आणि निर्दयीपणे हत्या करणारे आरोपी आणि त्यांचा आका वाल्मिक कराड हा राजकीय वरदहस्तामुळे मोठा गुंडा झाला. त्यापाठोपाठ आता बिळातून एक एक वाल्मिक बाहेर येत आहेत. शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेचे अनेक प्रताप समोर येत आहेत. त्याच्यामुळे भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आता आणखी एक गंभीर आरोप सुरेश धसांवर करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याने मारलेल्या हरणांचे मटण सुरेश अण्णा धस यांना पोहोच केले जाते. त्यामुळेच सतीश भोसले याच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत, असा खळबळजनक आरोप ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी केला आहे. हा खोक्या आणि त्याचे साथीदार चार-दोन किलोचा डब्बा भरून सुरेश धसांना घेऊन जायचे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. असा प्रकार जर होत असेल तर सतीश भोसले वर कसा गुन्हा दाखल होईल, असा सवाल मुंडे यांनी केला. या गंभीर प्रकरणासंदर्भात वनमंत्र्यांना तर भेटणारच आहे. मात्र त्यांच्या बॉसला मुख्यमंत्री यांची मी विशेष भेट घेणार आहे. या मुद्द्यावर मी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, अशी माहिती टी. पी. मुंडे यांनी दिली.
हरण तस्करीमध्ये सुरेश धस यांनाही सहआरोपी करा. ते पण आकांचे आका आहेत. वाल्मिक कराड याच्यापेक्षा तर सुरेश धस यांच्यावर जास्त गुन्हे आहेत. हरीण, डुक्कर आणि अन्य वन्य प्राण्यांची तस्करी करण्यावर बंदी असताना तस्करी कशी केली जाते? असा सवाल करत मुंडे यांनी धसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी धस आणि खोक्या यांच्याविरोधात उद्या, ९ मार्च रोजी रविवारी शिरूर येथे मोठा मोर्चा काढणार असल्याचे टीपी मुंडे म्हणाले. दरम्यान त्यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद पण साधला.
हे ही वाचा :
Rahul Gandhi: पक्षातील गटबाजीवर राहुल गांधी यांची तीव्र नाराजी
Follow Us