राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच भाजपकडून महाविकास आघाडीवर मोठा आरोप करण्यात आला असून महाविकास आघाडीकडून वोट जिहाद करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. व्होट जिहाद साठी मौलाना खलीलूर रहमान सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तास व्हिडो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रसारित केला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा मोठा खळबळजनक खुलासा केला असून मालेगाव मध्ये बेनामी अकाऊंट हे व्होट जिहादसाठी वापरल्याचा आरोप किरीट सोमया यांनी केला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील राजकारणाला मोठे वळण प्राप्त झाले आहे.
मालेगाव मध्ये बेनामी अकाऊंट हे व्होट जिहादसाठी वापरल्याचा आरोप भाजप किरीट सोमय्या करीत आहेत. आज त्यांनी इतर सात राज्यांतून २५३ कोटी रुपये मालेगाव मध्ये व्होट जिहाद साठी आल्याचे सांगितले. एकट्या उत्तर प्रदेश मधून २३ कोटी हे १७ अकाऊंट मधून मालेगावात आले आहेत आणि अश्या प्रकारे विविध राज्यातून तसेच परदेशातून हे पैसे आले असून ईडी मार्फत चौकशी सुरु असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. तसेच व्होट जिहाद साठी मौलाना खलीलूर रहमान सज्जाद नोमानी यांनी आवाहन केल्याचा आरोप ही सोमय्या यांनी केला आहे. या बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यावर त्याची दखल घेण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…