बिग बॉस मराठी सीजन ५ मधून घराघरात पोहचलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात असताना तिने घराबाहेर कोणीतरी असल्याचे म्हटले होते. तर डिसेंबर महिन्यात तिने तिचा होणारा जोडीदार कोण हे जाहीर केले होते. कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता सध्या तिच्या लग्नाच्या धावपळीत आहे. ती बरेचदा सोशल मीडिया वरून लग्नाच्या तयारीची झलक दाखवत असते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या लग्नाची पत्रिका गावदेवी समोर ठेवल्याचे दाखवले होते तेव्हापासून त्या पत्रिकांच्या वाटपाची सुरुवात झाली आहे. आता तिने आपल्या लग्नाचे खास आमंत्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले. या भेटीचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलाय.
आता जसजशी लगीनघटिका जवळ आली आहे तस तशी अंकिताची सुद्धा लग्नपत्रिका आमंत्रण देण्याची धावपळ सुरू आहे. नुकतीच ती दादर येथील राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर गेली होती आणि तिने राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांना भेटून लग्नाचे खास आमंत्रण दिले. अंकिताने जेव्हा लग्नाचे सर्व काही ठरले तेव्हा ही बातमी सर्वप्रथम राज ठाकरे यांनाच दिली होती. मध्यंतरी एक व्हिडिओ शेअर करत अंकिता म्हणाली, तुम्ही सर्वांनी माझा बिग बॉसच्या घरातील प्रवास पाहिला आहे. मी खूप भावनिक मुलगी आहे. आमचं लग्न ठरत होतं तेव्हाची एक गोष्ट तुम्हाला सांगते. आमच्या दोघांचे बरेच गुण जुळतात त्यापैकी एक गुण जुळला तो म्हणजे आमच्या भावना. त्या भावनांपैकी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माननीय राज ठाकरे. जेव्हा येक नंबर या चित्रपटाचे काम चालू होतं तेव्हा कुणाल सुद्धा याच चित्रपटासाठी काम करत होता. तेव्हा मला खूपच आनंद झाला. याच दरम्यान आम्ही राज ठाकरेंना सगळ्यात आधी लग्नाची बातमी दिली होती. राज साहेबांना आम्ही गुढीपाडव्यालाच लग्नाबद्दल सांगितलं होतं पण त्यानंतर बिग बॉस मुळे सगळ्या गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या.
अंकिता प्रभू वालावलकर बिग बॉस मराठीमध्ये टॉप ५ पर्यंत पोहोचलेली होती. तिने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून काम करायला सुरुवात केलेली. तिचे कोकणात स्वतःचे रिसॉर्ट सुद्धा आहे.कोंकण हार्टेड गर्लला खरी प्रसिद्धी बिग बॉस मुले मिळाली.
हे ही वाचा :
Dandruff समस्येसाठी करा हा रामबाण उपाय