ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरती असल्याचे वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. हे वर्ष आमच्या बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे. बाळासाहेबांनी देशासाठी महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी अनेकदा स्वतःचा भरीव योगदान देऊन काम केले आहे. काल रात्री सगळ्यांच्या सैनिकांच्या मानवतानुसार बाळासाहेबांच्या जन्म शताब्दी वर्षांमध्ये बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत.आमचे खासदार स्वतः अरविंद सावंत, अनिल देसाई बाकी खासदार त्याचा पाठपुरावा करतील, महाराष्ट्र आणि मुंबईचा पाठपुरावा आम्ही स्वतः करू, असे मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.
जळगाव रेल्वे अपघाताबाबत पेडणेकर म्हणाल्या की, जे होत आहेत त्याला रेल्वेमंत्री यांच्या बरोबरीने जे इतर कोण काम करत आहेत ते सर्व जबाबदार आहेत. मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या एक्सीडेंटमध्ये मनुष्य हानी मोठी होते, तसेच साधन सामग्री ह्याची देखील मोठी हानी होते, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पेडणेकर म्हणाल्या की, मराठा आरक्षण द्यायलाच हवं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मोठा-मोठा करून सर्व सांगत होते, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्यांनी आता मराठा आरक्षण दिले पाहिजे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण फक्त इलेक्शनपुरती होती कुठलाही तपासण्यात आला नाही. सरसकट सर्वांना आमच्यासारखा टॅक्स पीअर लोकांचे वाटले गेले आणि आता शुद्धीवर आल्यावर म्हणत आहेत की बांगलादेशी महिलांना देखील पैसे पोहोचले? मग केलं काय तुम्ही? फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलेला काम असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला.
हे ही वाचा :
मंत्र्यांचे OSD काय काम करतात? काय असते OSD? फडणवीसांचा मिशन काय?
UPSC च्या पूर्व परीक्षेची अधिसूचना जाहीर; (इतक्या) जागा रिक्त जाणून घ्या सविस्तर माहिती