spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

लालू यादव यांनी नरेंद्र मोदींवर केली टीका, तर सुधीर मुनगंटीवार यांनी केला तीव्र संताप व्यक्त, म्हणाले…

राष्ट्रीय जनता दलाचे (Rashtriya Janata Dal) नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी (India Alliance Meetings) मुंबईत (Mumbai) आले आहेत.

राष्ट्रीय जनता दलाचे (Rashtriya Janata Dal) नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी (India Alliance Meetings) मुंबईत (Mumbai) आले आहेत. लालू यादव यांचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं आहे. लालू यादव यांनी मुंबईत येताच भाजपवर (BJP) आणि खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. लालू यादव यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नरडीवर बसायचं आहे, असं धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या या विधानावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीतील मुंबईतील बैठक म्हणजे गंमत आहे. लालू प्रसाद यादव म्हणतात मला मोदींच्या नरडीवर बसायचं आहे. मात्र ही मुंबई आहे. इथून तिरडीवरच जातील, असा इशारा देतानाच यांचा एकच कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. तो म्हणजे मोदी हटाव, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

शरद पवार (Sharad Pawar) हे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केले असेल तर चौकशी केली पाहिजे. होय, चौकशी होणार आहे. काल शरद पवार यांच्या बाजूला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बसले होते. म्हणून पवार तसे म्हणाले नाही ना? असा प्रश्नही आम्हाला पडला आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. काल एक नेता म्हणाला मुंबई तोडणार. मुंबई तोडायची कुणाच्या माईच्या लालची हिंमत आहे? हिटलरच्या गोबेल्ससारखी ही नीती आहे. हे सगळं सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शरद पवार यांनी आराम करावा ही त्यांच्या पक्षाच्या लोकांचीही इच्छा होती. पण अनेकांना मोह सुटत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

हे ही वाचा: 

पुण्यातील ‘वृक्षगजानन’ मूर्तीला मोठी मागणी

Asia Cup 2023, पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत विजय, नेपाळचा २३८ धावांनी पराभव…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss