महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी उसंडी मारल्याचं दिसून आलं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीचा २३६ जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर यश मिळाले. महायुतीत एकट्या भाजपने १३२ जागा जिंकल्या.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर लक्ष्मण हाके यांना तुम्ही विधानपरिषदेवर जाणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर लक्ष्मण हाके म्हणाले, “विधानपरिषद नको, माझी लायकी त्याहून मोठी आहे. मला राज्यात गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा शिक्षणमंत्री करा. त्या सातवी-आठवी पास असलेल्या सुरेश धसला जर तुम्ही मंत्री करणार असाल तर त्यापेक्षा मला करा. माझी लायकी जास्त आहे, ज्ञान जास्त आहे. ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करणार.”
पुढे लक्ष्मण हाके म्हणाले की, “ओबीसींनी त्यांचा प्रभाव दाखवला आहे. निवडणुकीच्या निकालाच्या अगोदरच सांगितलं होता की, हरियाणा पॅटर्न असेल. माझ्यामुळे अनेक उमेदवार आले आणि अनेकजण पडले. जरांगे, टोपे, शरद पवार हे हवेत होते, त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला. राजेश टोपे यांची २५ वर्षांची सत्ता ही २५०० मतांनी घालवली. रोहित पवारांचे कान कापून विजय साजरा केला.” तसेच आम्ही ९ ठिकाणी उमेदवार घेतली. त्यांनी हजारो मतं घेतली. जरांगेसारखी शेपूट घालून पळून गेलो नाही. इतर ठिकाणी आम्ही महायुतीला पाठिंबा दिला होता. गेल्या विधानसभेला धनगर समाजाचा एकाच आमदार होता, आत सात आमदार झाले आहेत. उत्तम जाणकारांना आम्ही निवडून आणलं”, असंही ते म्हणाले. ज्याच्या नावाने मतं मागितली, ज्यांचा चेहरा या निवडणुकीत वापरला त्यालाच मुख्यमंत्री करा असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांच्या नावाला समंती दिली.
हे ही वाचा:
Bhaskar Jadhav: शिवसेना गटनेता पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भास्कर जाधव यांचे मोठे वक्तव्य
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.