spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

सरकार स्थापन होईल तेव्हा विरोधी पक्षनेता ठरेल: Ambadas Danve

Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असले तरीही मुख्यमंत्री मात्र कोण होणार हे अजून जाहीर झाले नाही. अश्यातच आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाचे विधानपरिषद आमदार आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आता विरोधी पक्ष नेते पदाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार, २५ नोव्हेंबर) शिवसेना उबाठा पक्षांच्या नवनिर्वाचित २० आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उबाठा पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीनंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही विधीमंडळ पक्षाची बैठक होती ज्यामध्ये नवनिर्वाचित सदस्य, विधानपरिषदेचे सदस्य होते. सरकारवरती अजून दावा केला नाही जेव्हा सरकार स्थापण होईल तेव्हा विरोधीपक्षनेते पदी निवड केली जाईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा गटनेते पदी भास्कर जाधव यांची नियुक्ती केली आहे. आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ गटनेते पदी नियुक्ती केलेली आहे. सुनील प्रभू यांची पुन्हा प्रतोद पदी निवड झाली आहे. आता सगळे आमदार विधीमंडळात चालले आहेत पक्षाचे जे काही कामकाज आहे ते पुर्ण करण्यासाठी आम्ही जात आहोत. सगळे निवडून आलेले आमदार आज उपस्थित होते.” असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेना नेते या आमदार आदित्य ठाकरे विधिमंडळ सभागृह नेता बनले आहेत. तर भास्कर जाधव यांच्याकडे शिवसेना गटनेता पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे विश्वासू आणि निकटवर्तीय आमदार सुनील प्रभू यांच्याकडे प्रतोप पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. तर प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना उबाठा गटातील निर्णय होतील.

हे ही वाचा:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मुंबईतील विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss