पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करु नये अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली होती त्यानंतर याबाबत म्हणणं मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार गटातील आमदारांना नोटीस बजावली. आतापर्यंत शरद पवार गटातील १० आमदारांना नोटीस बजाववण्यात आली आहे. याआधी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली होती. आता पुन्हा आठ आमदारांना नोटीस बजावण्यात आलीये. शरद पवार गटातील अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना मात्र अद्याप कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही. तसेच नवाब मलिकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांनी देखील कोणतीही नोटीस बजावली नाही.
‘या’ आमदारांना बजावली नोटीस
अनिल देशमुख,राजेश टोपे, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षिरसागर या आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षात फुट पडली आणि पक्षावर दावा करण्यात येऊ लागला. त्यानंतर पक्ष, चिन्ह यांची लढाई सुरु झाली. त्यानंतर आपल्याला अपात्र का करु नये याबाबत अजित पवार गटाकडून याचिका विधीमंडळात करण्यात आली होती. त्यावर म्हणणं मांडण्यासाठी शरद पवार गटाच्या आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
याआधी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली होती. आता पुन्हा आठ आमदारांना नोटीस बजावण्यात आलीये
हे ही वाचा :
आता ‘iPhone’ ही होणार ‘मेड इन इंडिया’ (Made in India)
संजय राऊतांनी फडणवीसांनी डिवचलं, मी पुन्हा येईल चं आम्ही सध्या स्वागत करतो कारण…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .