महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असे म्हटले होते. त्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी जोपर्यंत मी बोलू शकतोय, तोपर्यंत चर्चेला या. चर्चेसाठी ज्यांना यायचंय, त्यांना कोणीही अडवणार नाही, असे मत स्पष्ट केले. सरकारकडून कोणीही माझ्यासोबत चर्चा करायला आले नसल्याचे मत मनोज जरांगे-पाटील यांनी मांडले. त्याच मुद्द्यावरून सरकारकडून मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करायला कोणीच का गेले नाही, या प्रश्नाचे उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे, आम्ही मनोज जरांगे पाटील यांची एक नाही तर शंभर वेळा भेट घेऊ, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. परंतु सध्या तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. यामुळे तेलंगणा सरकारकडून मराठा समाजातील नोंदीसंदर्भातील कागदपत्रे मिळण्यास अडचण येत आहे. तरी यासंदर्भात लवकरच तोडगा निघेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी अद्यापपर्यंत २३ बैठका घेतल्या आहेत. सोमवारी पुन्हा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आहे. आम्ही मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देऊ, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना फोन केला होता. मात्र त्यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी आमच्या गावात कुणीही पुढारी येऊ नका, असे म्हटले होते. त्यामुळे सरकारकडून जरांगे-पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी कोणीच गेले नाही. जर मनोज जरांगे-पाटील यांची परवानगी असेल तर सरकार नक्कीच चर्चेला जायला तयार आहे. आम्ही एक नाही तर १०० वेळा सुद्धा त्यांच्या भेटीला जाण्यास तयार आहोत. असे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा :
मिठाच्या पाण्यामुळे चांगले पचन आणि मिळते तजेलदार त्वचा,जाणून घ्या फायदे.
Kali-Pili Taxi: मुंबईत होणार बंद
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .