Friday, June 2, 2023

Latest Posts

LIVE, उद्धव ठाकरेआणि अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे दुसऱ्या वेळेला मातोश्रीत आलेले आहेत. नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोक केवळ राजकारण करतात परंतु आम्ही राजकारणाच्या पलीकडे नातं जपत असतो. अरविंद तुम्ही आले आहेत मी तुला सांगू इच्छितो आम्ही नातं सांभाळणारे लोक आहोत. राजकारण आपल्या जागेवर आहे. येणार वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. या वेळेला जर ट्रेन सुटली तर आपल्या देशांमधून प्रजासत्ताक गायब होईल. लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. अरविंद केजरीवाल त्यांनी जो एक निर्णय घेतला होता तो निर्णय संविधानाची गरजेचा होता परंतु त्याच्या विरोधात तो निर्णय घेतला. हे कोणत्या प्रकारचं न्याय आहे. काही दिवसांनी असे सुद्धा निर्णय येतील की देशामध्ये फक्त निवडणुका होतील राज्यामध्ये निवडणूका होणार नाहीत. निवडणुका २०२४ पर्यत होण्याच्या शक्यता आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

याच पत्रकार परिषदेमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी बोलताना सर्वात आधी उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटूंबाचे कौतुक केले. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आता त्याच्या कुटूंबाचा भाग बनवलेला आहे. ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे म्हणाले त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा नातं टिकवणारे लोक आहेत. आम्ही जे नातं बनव आहे ते नातं आम्ही संपूर्ण आयुष्य ते निभावू असे अरविंद केजरीवाल म्हणाले. जस तुम्हाला सर्वाना माहिती आहे की दिल्लीच्या लोकांनी खूप मोठी लढाई लढली आहे आपल्या अधिकारासाठी. जेव्हा आम्ही सरकार आली २०१५ मध्ये तेव्हाच मोदी सरकारने आमच्याकडून सर्व अधिकार कडून घेण्यात आले. फेब्रुवारी २०१५मध्ये सरकार उभी केली आणि ३ महिन्यामध्येच ८ वर्ष दिल्लीच्या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये लढाई लढली आहे. ८ वर्ष लढाई लढल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला. ज्या दिवशी निर्णय देण्यात आला त्यांनतर ८ दिवसाच्या आधीच केंद्रसरकार अध्यादेश जाहीर करून ते सर्व अधिकार पुन्हा घेण्यात आले. असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले की, संविधानामध्ये जनताची चालली पाहिजे की गव्हर्नरची चालली पाहिजे? जनता ची चालली पाहिजे की केंद्राची चालली पाहिजे? संविधानामध्ये त्याचबरोबर लोकशाहीमध्ये जनतेने निवडून दिलेल्या सरकारची चालली पाहिजे. मोदी सरकार हे सिद्ध करत आहेत ते सुप्रीम कोर्टाला आम्ही मानत नाही. मागील अनेक महिन्यांपासून यांचे हावभाव आहेत ते सुद्धा मी पहिले आहेत. कस यांच्या मंत्र्यांनी यांच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टाच्या नेत्यांना कशाप्रकारच्या शिव्या दिल्या आहेत. आताच्या सरकारचे लोक कसे न्यायाधीशांच्या विरोधात सोशल मीडियावर कॅपिंग चालवत असतात. हे संविधानाला पण मनात आणि लोकशाहीला पण नाही मानत. शिवसेना तर सर्वात जास्त या सर्व घटनेला सामोरे गेली आहे. उद्धव ठाकरे यांची बहुमत वाली सरकार यांनी खाली पडली. भाजपच्या सरकारला खूप अहंकार झाला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप जास्त अहंकार तेव्हा तो व्यक्ती खूप स्वार्थी होतो. असा व्यक्ती देश चालवू शकत नाही जो एवढ्या अहंकार आणि स्वार्थी असेल. असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss