Saturday, April 20, 2024

Latest Posts

आताचे सरकार बेकायदेशीर, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

काल ऐतिहासिक सत्तासंघर्षाचा निकाल लागला. अनेक आरोप प्रत्यारोप झाले त्यांनतर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की, आज मी ठरलेल्या माझ्या कार्यक्रमाप्रमाणे आज मी शिर्डीला जात आहे तेथून यशवंतराव गडखान यांचा वाढदिवस त्यांना मी आधीच सांगितले होते की तुम्हाला भेटायला मी येईल. पत्रकार परिषद घेण्याचा हेतू एकूणच महाराष्ट्रामध्ये जी काय बेबंद शाही माजवण्याचा जो काही प्रयत्न सुरु आहे त्यावर काल सर्वाच्च न्यायालयाने निकाल दिले आणि परखड भाष्य केलेले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांनी जी शिवसेना मराठी माणसाच्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या हिंदूंच्या रक्षणासाठी स्थापन केली आणि ती जोपासली प्राणापलीकडे त्याच्यावर प्रेम केलं अशी शिवसेना गद्दाराच्या माध्यमातून आपल्या दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट हा काल सर्वाच्च न्यायालयाने उघडा पाडला असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदुत्वाच्या नावाखाली किंवा हिंदुत्वाच्या बुरख्याखाली यांचा दडलेला बेबद्ध चेहरा हा काल सर्वाच्च न्यायालयाने उघडा पाडला. त्याच्याबद्दल मी सर्वाच्च न्यायालयाला मी खास धन्यवाद देतो. एकूण या निकालाचा अर्थ काय? अनेकांनी त्याच्यावर मत प्रदर्शन केले आहे अगदी सर्व सामान्य माणसाने सुद्धा त्यावर मत प्रदर्शन केले आहे, काही जणांनी आनंद साजरा केला फटाके वाजवले मी भारतीय जनता पक्षाने आनंद व्यक्त केला हे मी समजू शकतो कारण त्यानं हे झालेल ओझं उतरवण्याचा मार्ग सर्वाच्च न्यायालयाने दाखवून दिला म्हणून त्यांनी फटाके वाजवले असतील तंत्र मी समजू शकतो. पण जे गद्दार आहेत त्या गद्दारांनी फटाके वाजवल्याचे कारण मला काही समजले नाही. असे म्हणतात कारण त्यांना रेडा वगैरे या गोष्टी चांगल्याच माहिती आहेत असे मी ऐकले आहे मी काही पहिले नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष सर्वानाच माहिती आहेत पूर्वी ते आमच्याकडे होते, काही काळ राष्ट्रवादी मध्ये होते त्यांनतर आता ते भारतीय जनता पक्षाकडे आहेत एकूण त्यांना राजकीय प्रवासाची कल्पना आहे आणि तो प्रवास कसा करायचा हे त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून हे त्यांना चंगळ कळत प्रश्न असा आहे की आता संपूर्ण जगात महाराष्ट्राची जी अवहेलना चालू आहे महाराष्ट्र म्हणजे शूरांचा आणि शौर्याचा महाराष्ट्र अगदी आपल्याकडचा मराठ्यांचे वर्णन अगदी त्यावेळेला सुद्धा केले गेले होते. महाराष्ट्राची आता हि बदनामी थांबली पाहिजे या सगळ्या निकालपत्रात माननीय सर्वाच्च न्यायालयाने एक निरीक्षण असे नोंदवलेले आहे जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आले असते पण त्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता येत नाही. याचाच अर्थ असा आता अस्तित्वात असलेले सरकार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे जे मी राजीनामा दिला नसता तंत्र त्यांनी मला पुन्हा मुख्यमंत्री केले असते असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, मी माझ्या निर्णयावर अजूनही समाधानी आहे मी नैतिकतेला जागून राजीनामा दिला याचे कारण म्हणजे ज्या लोकांना शिवसेना प्रमुखांपासून मी सुद्धा पक्षप्रमुख काळामध्ये सर्वकाही भरभरून दिले. सर्वात महत्वाचे म्हणजे आपलं मानलं विश्वास दिला त्या विश्वास घातक्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला. आताच्या सरकारला तात्पुरते जीवनदान मिळाले आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss