Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करत आणि मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना स्थापन केली. या पक्षाचे सरकार सत्तेत आणले. पुढे अनेक वादळे शिवसेनेने झेलली. 2019 नंतर शिवसेनेने भूमिका घेत महाविकास आघडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर एकनाथ शिंदे यांनी बंड करत वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. आता एक शिवसेना सत्ताधाऱ्यांसोबत तर दुसरी सेना ही विरोधी खेम्यात एकमेकांविरोधात दंड थोपटून आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त मुंबईतच नाही तर राज्यभर त्यांना दोन्ही शिवसेनेकडून अभिवादन करण्यात येत आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारीला महाराष्ट्रात दोन्ही शिवसेना पक्ष शक्तिप्रदर्शन करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बीकेसी मैदानावर आपला कार्यक्रम आयोजित केला आहे, तर दुसरीकडे अंधेरी पश्चिम येथे उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. शिवसेना खरी आणि खोटी हे दोघेही सभांमध्ये एकमेकांवर हल्लाबोल करणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवून अडीच कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांच्या लाडक्या बहिणींच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे एकनाथ शिंदे व निवडून आलेल्या सर्व आमदार व खासदारांचे शिवसैनिक व राज्यातील तमाम नागरिकांच्या वतीने भव्य नागरी स्वागत करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत शिवसेनेचे ७ खासदार तर विधानसभेत शिवसेनेचे ५७ आमदार निवडून आले. विधानसभेत शिवसेनेला उभारापेक्षा १५ लाख ६३ हजार ९१७ मते जास्त मिळाली. एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात सोनू निगमचा शो होणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे भाषण होईल. प्रत्येक आमदाराला आपापल्या भागातील कार्यकर्त्यांसह कार्यक्रमात सहभागी व्हावे लागणार आहे. सोनू निगमच्या शोसाठी स्टेज तयार झाला आहे.
तर दुसरीकडे गेल्या २४ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संजीवनी देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार आहेत. ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे समीकरण वेगळे असले तरी यावेळी ठाकरेंना सत्ता मिळवणे कठीण झाले आहे. अंधेरी परिसरातील वीरा देसाई रोडवर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. तसेच आज सकाळीच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांनी कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. तर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी शिंदे गटाला हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करून दिली.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हे दोन्ही मेळावे पहिल्यांदाच होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे २० आमदार आणि ९ खासदार आहेत. आता ठाकरेंची नजर मुंबई महापालिकेवर आहे, त्यामुळे मुंबईबाबत ठाकरे भाजप आणि शिंदे यांना टार्गेट करणार आहेत.
हे ही वाचा :