Maharashtra Budget session 2025: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावेळी शरद पवार गटाचे गटनेता जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्याच दिवशी विधिमंडळात खळबळजनक एन्ट्री केली. महाराष्ट्राचे २ गुंडे मुंडे आणि कोकाटे, अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) जितेंद्र आव्हाड हे हातात बेड्या घालून विधानभवनात पोहोचले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शरद पवार गटाचे गटनेते जितेंद्र आव्हाडांची विधिमंडळातील एन्ट्री चांगलीच गाजली. जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधिमंडळात आले. त्यांच्या या कृतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय, व्यक्त होणं हा आमचा मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार शाबूत राहावे हा आमचा अधिकार आहे. हातात बेड्या घालून आम्ही निषेध करत आहोत. राईट एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबूत राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
अमेरिका आपला बाप नाही
“अमेरिकेत भारतीयांवर अन्याय होत आहे. व्हिसाच्या बाबत ट्रम्प सरकारने आखलेले धोरण अनेकांचे घर-संसार उद्ध्वस्त करणारे आहे. भारतीयांना विमानातून कोंबून देशात पाठवण्यात आले. पायात साखळदंड, हातात हातकड्या, शौचालयाला जागा नाही, उपाशी हा प्रकार भारतीयांना हिणवणारा आणि अपमानीत करणार होता. अमेरिकेत जाऊन मोठे होणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न उद्ध्वस्त होताना दिसत आहे. याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते, आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण याच पेचात अडकलेत. पोरं अमेरिकेत राहतील, आई बाप मुंबई महाराष्ट्रात येतील, किंवा आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठ्या होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांच्या स्वप्नांना उध्वस्त होताना दिसत आहेत. बेड्यांविरुद्ध भारतीय बोलत नाही, अमेरिकेच्या अन्यायाविरुद्ध व्यक्त नाही झालो तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नका. अमेरिकेविरुद्ध आवाज उठवा. अमेरिका आपला बाप नाही,” असे आव्हाड यांनी ठणकावून सांगितले.
हे ही वाचा:
Skin Care: पिंपल्सच्या समस्येपासून सुटकारा; गुलाब पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी