spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Maharashtra assembly election results 2024 : ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे- धनंजय मुंडे

Maharashtra Vidhansabha Election Result 2024 : संपूर्ण देशामध्ये सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शनिवार २३ नोव्हेंबरला जाहीर होत आहे. तसेच मतमोजणी सुरु असून संपूर्ण देशासह राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिला कौल हाती आला आहे. अश्यात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या विरोधात आहेत. तसेच महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे ६७१२० मतांनी आघाडीवर आहेत.

बीड जिल्याहातील परळी विधानसभा निवडणुकीत महायुतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोध शरद पवार गटाचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत बघायला मिळाली शरद पवार स्वतः मैदानात उतरल्यामुळे परळीत मुंडेंच टेंशन वाढलं होत. मात्र पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी बाजी मारली आहे. तसेच यावर्षीची विधानसभा निवडणुक महायुतीसह महविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यामुळे या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांनी आपली ताकदही पणाला लावली आहे. मात्र बीड जिल्ह्यातील मतदारसंघात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळाली होती. पण आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि धनंजय मुंडे हे विजयी जाहले आहेत. धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा पराभव केला आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शनिवार २३ नोव्हेंबरला जाहीर होत आहे. तसेच मतमोजणी सुरु असून संपूर्ण देशासह राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिल कला हाती आला आहे. तसेच बीड मतदारसंघातून धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होती यात धनंजय मुंडे यांचा विजय झाला आहे. धनंजय मुंडेंनी असं वक्तव्य केलं आहे की, उपमख्यमंत्री अजित पावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भगिनी पंकजा मुंडे यांच्यामुळे हे यश मिळाले आहे.

तसेच जात-पात, धर्म यावर लोकसभेची निवडणूक झाली परंतु या निवडणुकीत ते चालेले नाही. असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले आहे. ते म्हणाले की, ही एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे. धनंजय मुंडे यांनी पुढे म्हंटल आहे की, मी पाहिल्यादिवशी सांगितले होते की विजय हा महायुतीला निर्णायक मिळेल. माझ्या पराभवासाठी परळी मतदारसंघात मोठी ताकद लावण्यात आली होती. परंतु अशी ताकद लावल्यावर परळीमधील जनता काय करते हे दाखवून दिले आहे.

हे ही वाचा:

Maharashtra Election Results 2024 :महायुतीला लाडक्या बहिणींचा भरभरून प्रतिसाद ; पुन्हा एकदा सत्तेत

Maharashtra Election Result 2024: महायुतीच्या यशावर Eknath Shinde यांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss