Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असले तरीही मुख्यमंत्री मात्र कोण होणार हे अजून जाहीर झाले नाही. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा आज (सोमवार, २५ नोव्हेंबर) होणार असल्याचं महायुतीकडून जाहीर करण्यात आले आहे. अश्यातच आता अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी महायुतीच्या या विजयाबद्दल मोठे भाष्य केले आहे.
रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. ते यावेळी म्हणाले, “भाजपने मोठा भाऊ म्हणून निकाल आज लागला. अमरावती जिल्ह्यात मेळघाट, अचलपूर. तिवसा, मोर्शीतून भाजपचे आमदार निवडून आले. बहुमताने अमरावतीत कमळ फुलल. खोटे बोलून जे मत मिळवली होती. त्याचा हिशोब विदर्भातील अमरावतीच्या जनतेने घेतला. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी बच्चू कडू यांनी सुपारी घेऊन काम केले. यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात सभा घेतल्याने त्यावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष बोंडे यांनी यश मिळवले.”
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पूर्ण पाठिंबा
ते पुढे म्हणाले, “लाडक्या बहिण २१०० दिले पुढे ३००० होईल. लोकसभेत राहुल गांधी यांनी आरक्षण जाईल असं खोटं बोलून मत मिळवले. त्याचा बदला जनतेने घेतला आणि काँग्रेसचीला घरी बसवलं. देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पूर्ण पाठिंबा आहे. अजित पवार हे छोटे भाऊ आहेत. यापेक्षा मोठे एकनाथ शिंदे आहे. सर्वात मोठा भाऊ भाजप आहे. देवेंद्र फडणवीस यांना स्वीकारून मोठ्या प्रमाणात जागा निवडून आल्या. तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे.
महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मंत्री पदाचा विषय नाही, इच्छा पण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करत असल्यामुळे त्यांना जाऊन शुभेच्छा देणार आहे. अमरावतीच्या यशाबद्दल देवेंद्रजी सोबत बोलणं झालं अभिनंदन केलं. नवनीत राणा या महाराष्ट्राच्या राजकारणात काम करणार नाही. भाजप मजबूत राहण्यासाठी नवनीत राणा यांनी प्रचार सभा घेत काम केलं. आज भाजपला मिळालेला कौल आहे. सर्वांच्या मनात आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत.”
*उद्धव ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गद्दारी केली. सर्वांना माहित आहे ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री असते. हे एकनाथ शिंदे यांनाही माहित आहे आणि अजितदादा यांनाही माहित आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”