spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्रातील निकालाला सरन्यायाधीश D.Y. Chandrachud जबाबदार, Sanjay Raut यांचे मोठे वक्तव्य

Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. यावरून, आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून मोठे भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Justice D. Y. Chandrachud) यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील निकालाला सरन्यायाधीश चंद्रचुड जबाबदार असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे.

संजय राऊत यांनी आज (रविवार, २४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, “महाराष्ट्रातील या घडामोडींना जवाबदार जर कोणी असेल तर ते सरन्यायाधीश चंद्रचुड आहेत. देशाचे सुप्रीम कोर्ट ज्याने आमदार आपात्रतेच्या संदर्भात वेळेत निर्णय द्यायला हवा होता तो त्यांनी घेतला नाही. मग तुम्ही कशासाठी बसला आहात? जर निर्णय नाही द्यायचं तर खुर्च्या का उबवतात? सरकारवर का ओझं म्हणून बसला आहात? जनतेच्या पैशाचा तुम्ही चुराडा करत आहात.”

ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे धनंजय चंद्रचूड हे लेक्चर देण्यासाठी प्रोफेसर म्हणून चांगले आहेत, मात्र सरन्यायाधीश म्हणून नाही. सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक विषयांवर निर्णय देणे अपेक्षित होते. सरन्यायाधीश म्हणून ते निर्णय देऊ शकले नाहीत. त्यामुळे इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रात चित्र बदललं असतं. त्यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराची दारखिडक्या उघड्या ठेवल्या आहेत. आत्ता देखील कोणीही कशाही उड्या मारू शकेल विकत घेऊ शकेल. कायद्याची भीती राहिली नाही. न्यायमूर्तींनी ती भीती घालवली. तुम्ही खुशाल पक्षांतर करा आम्ही इथे बसलेलो आहोत. या सगळ्या घटनांना जस्टीस चंद्रचूड हेच जबाबदार आहेत. इतिहासात त्यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहल जाईल,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मुंबईतील विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss