spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्रात शपथविधी घेतला तर तो छत्रपतींचा आणि १०६ हुतात्म्यांचा अपमान: Sanjay Raut

Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असले तरीही मुख्यमंत्री मात्र कोण होणार हे अजून जाहीर झाले नाही. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा हा उद्या (सोमवार, २५ नोव्हेंबर) होणार असल्याचं महायुतीकडून जाहीर करण्यात आले आहे. अश्यातच आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून मोठे भाष्य केले आहे.

संजय राऊत यांनी आज (रविवार, २४ नोव्हेंबर) पत्रकारांशी संवाद साधत यावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “महायुती म्हणून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय ते घेतील. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यास भाजपचा विरोध आहे. दिल्लीत तसा निर्णय झाला आहे अशी माझी माहिती आहे. नवीन सरकार येतंय जरी आम्हाला निवडणुकांचे निकाल अमान्य आहेत. निवडणुकांमध्ये हार जीत होते. पण पहिल्या दोन तासात जी लढाई होती ती बरोबर सुरू होती. पुढील दोन तासांच्या पद्धतीने निकाल लागला तो संशयास्पद आहे. लोकशाहीत असं काही होत नाही. हरियाणामध्ये पुढील दोन तासात जे झालं तेच महाराष्ट्रात झाले. निकाल आधीच ठरवले होते. मतदान फक्त होऊ दिले,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री कोण बनणार हे गुजरात लॉबी ठरवेल. महाराष्ट्रात शपथविधी घेण्यापेक्षा गुजरात मध्ये शपथविधी सोहळा घ्या. त्यांच्या लोकांना आनंद होईल. गुजरातमध्ये जो मोदींच्या नावाने स्टेडियम आहे तिथे शपथविधी घ्या. मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क येथे सोहळा घेतला तर तो छत्रपतींचा अपमान असेल आणि वानखेडे स्टेडियमला घेतला तर १०६ हुतात्म्यांचा अपमान होईल. त्यामुळे शपथविधीसाठी त्यांनी गुजरातची निवड करावी. हे सरकार गुजरात लॉबीसाठी हवं होत. म्हणून आणण्यात आले आणि लादण्यात आले,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे वारसदार होऊ शकत नाही. बाळासाहेबांचा वारसा हा पैशांनी विकत घेता येत नाही. बाळासाहेबांनी देखील पराभवाचे धक्के पचवले आहेत. त्याची पर्वा न करता बाळासाहेब लढत राहिले. हा इतिहास एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी समजून घ्यावा. लोकांचा कौल वैगरे या गोष्टी आम्हाला शिकवू नका,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मुंबईतील विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss