सध्या राज्याच्या राजकारणात बरीच उलथा-पालथ होताना दिसत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक सूत्र हलताना दिसत आहेत. त्यातच काल ४ मार्च रोजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनतर आता भाजपच्या आमही एका मंत्र्यावरती विरोधी पक्षाने हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘लाडके मंत्री’ म्हणून ओळखले जाणारे जयकुमार गोरे यांच्यावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा आपले टीकास्त्र सोडून सर्व पक्षाचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले आहे.
संजय राऊत म्हणाले, “इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ आणि विनयभंग केला या संदर्भातील माहिती समोर आली आणि ती महिला पुढल्या काही दिवसात विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहेत, आता हे पात्र नवीन निर्माण झाले. फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे, ही सगळी १४ रत्न आहेत. जयकुमार गोरे यांच्या बाबतीत आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनयभंग केला आणि तो जर मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल त्यामुळे महाराष्ट्र कलंकित होतो आणि अशा कलंकित मंत्र्यांना संजय राठोडपासून सगळे आपण का मंत्रिमंडळात ठेवले आहे, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांनी जयकुमार गोरे यांच्यावर हल्लाबोल तर केलाच शिवाय विजय वडेट्टीवार यांनीही एक वक्तव्य केले. ते म्हणाले, “एक पश्चिम महाराष्ट्रातला मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो. जेलमध्ये जाऊन येतो आणि मंत्री झाल्यावर तिच्यापाठी लागतो. पहिल्या महिला राष्ट्रपतींची जमीन हडपतो. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आता कोकाटेंचा राजीनामा बाकी आहे. अबू आझमी आणि भाजप मुख्य मुद्द्यापासून पळवाटा काढण्यासाठी पर्याय शोधात आहे”, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला आहे.
हे ही वाचा:
वाल्मिक कराडच्या विरोधात सर्वात मोठा पुरावा; खंडणी कनेक्शन सिद्ध करणारा व्हिडीओ पोलिसांना सापडला
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश