Saturday, April 20, 2024

Latest Posts

Maharashtra political Crisis, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचं प्रकरण ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल हा निकाल हा लागला आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल हा निकाल हा लागला आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण आता ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने १० प्रश्न तयार करून हे प्रकरण सात न्यायाधीशाच्या लार्जर बेंचकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

काही महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून काढता पाय घेतला. आणि शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी गुवाहाटी गाठलं. त्यावेळी विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांना अपात्रतेची नोटिस बजावली. ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा दिला आणि त्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

तसेच आज कोर्ट म्हणाले आहेत की, भरत गोगावले यांची प्रतोदपदी करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे. कोणत्याही कायदेशीर कार्यवाही शिवाय ही नियुक्ती करण्यात आली, असं कोर्टाने निकालात स्पष्टपणे म्हटलं आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण अजून लांबणार असल्याने शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss