Sunday, June 4, 2023

Latest Posts

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

अखेर आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल हा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे.

Maharashtra Political Crisis : अखेर आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल हा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत.

काही महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून काढता पाय घेतला. आणि शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी गुवाहाटी गाठलं. त्यावेळी विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांना अपात्रतेची नोटिस बजावली. ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा दिला आणि त्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

अपात्रतेची टांगती तलवार असणारे १६ आमदार कोण?

एकनाथ शिंदे
अब्दुल सत्तार
तानाजी सावंत
यामिनी जाधव
संदिपान भुमरे
भरत गोगावले
संजय शिरसाट
लता सोनवणे
प्रकाश सुर्वे
बालाजी किणीकर
बालाजी कल्याणकर
अनिल बाबर
संजय रायमुलकर
रमेश बोरणारे
चिमणराव पाटील
महेश शिंदे
घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित

 

आमदार अपात्र ठरल्यास…

उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यायचा असून, त्यात शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांचे सदस्यत्व रद्द केले, तर अशा स्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. ज्यामध्ये बहुमतासाठी १४५ च्या जादुई आकड्याला स्पर्श करणे आवश्यक आहे. फडणवीस-शिंदे सरकारकडे १६६ आमदार आहेत. तर महाविकास आघाडीचे १२० आमदार आहेत. आणखी दोन आमदार आहेत.

शिंदे यांच्या बाजूने निकाल लागला तर…

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेला तर तो मोठा राजकीय विजय असेल. यासह, तो राज्यात दीर्घ खेळीकडे जाणारा खेळाडू बनेल. एवढेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर पक्षाच्या पारंपरिक मतदारांना आकर्षित करण्याच्या शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गटाच्या) प्रयत्नांना तोंड देण्यासही त्याची मदत होईल. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला बळ मिळण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या बाजूने निर्णय आल्याने पुन्हा एकदा उद्धव गटातून पक्षांतराचा टप्पा सुरू होऊ शकतो.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss