Monday, December 4, 2023

Latest Posts

MAHARASHTRA POLITICS: त्यांना लोकनेता कधी पटत नाही- रोहित पवार

अलीकडेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते अजित पवार (AJIT PAWAR) यांच्यासह ४० आमदारांनी शिंदे (SHINDE)-फडणवीस (FADANVIS) सरकारला पाठींबा दिला. सत्तेत सहभागी झाल्याननंतर अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही दोन पदे देण्यात आली. अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रीचे पद जरी देण्यात आले असेल, तरी त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADANVIS) यांचे नियंत्रण असल्याचे बोलले जात आहे. अशी राजकीय स्थिती असल्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (AMIT SHAH) यांची भेट घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना अर्थात अजित पवार गटाच्या आमदारांना निधी दिला जात नसल्याची तक्रार केल्याचे संकेत मिळाले होते. यावर आता शरद पवार (SHARAD PAWAR) गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचे मत मांडले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

अजित पवार हे नक्कीच नाराज आहेत. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरीही ही गोष्ट लक्षात येते. त्यांची नाराजी वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते. भारतीय जनता पक्षाला (BJP) लोकनेता कधी पटत नाही. त्यांना त्यांच्या पक्षातला किंवा बाहेरून आलेला कोणताही लोकनेता कधीच पटत नाही. अशा लोकनेत्यांची ताकद भारतीय जनता पक्ष हळू-हळू कमी करण्याच्या प्रयत्नात आहे.  तीच गोष्ट भाजपने अजितदादांच्या बाबतीत केली आहे.

अजित पवार यांच्या दिवाळीत घरी येण्याच्या मुद्यावरून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? 

आमचे वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. जेव्हा आपले वय वाढते तेव्हा वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे. आमची लढाई वैचारिक आहे, व्यक्तिगत नाही. राजकीय मतभेद आहेत पण भाजपच्या अनेक नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत. दादा कार्यक्रमात मास्क लावून बसले होते. त्यामुळे त्यांना भेटण्याची मुभा आहे की नाही हे डॉक्टर ठरवतील. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हे शरद पवारांचे टॉनिक आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.

हे ही वाचा : 

प्रार्थना बेहेरेने शेअर केला चार जणांचा व्हिडिओ,प्रार्थना म्हणते  ‘हीच माझी दिवाळी’

MAHARASHTRA: शरद पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss